Headlines

AI entry, system to be implemented from 2025-26, from training to appraisal of government employees


  • Marathi News
  • National
  • AI Entry, System To Be Implemented From 2025 26, From Training To Appraisal Of Government Employees

मुकेश कौशिक/अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

सरकारी कर्मचाऱ्यांचा वार्षिक परफॉर्मन्स रिपोर्ट (एपीएआर) आता फक्त त्यांच्या बॉसची टिप्पणी आणि दिलेल्या गुणांपुरता मर्यादित राहणार नाही. यात कर्मचारी आपल्या पदासाठी आणि भूमिकेसाठी निश्चित डिजिटल ट्रेनिंग पूर्ण केले आहे की नाही हेही पाहिले जाईल. एवढेच नाही तर ट्रेनिंगनंतर होणारे व्यापक मूल्यांकन पास केले आहे की नाही याचा डिजिटल रेकॉर्डही एपीएआरमध्ये दिसेल. कार्मिक व प्रशिक्षण विभागाने मिशन कर्मयोगीच्या आयगॉट प्लॅटफॉर्मला सरकारी कर्मचाऱ्यांच्या परफॉर्मन्स अप्रायझल व्यवस्थेशी जोडले आहे. नवी व्यवस्था २०२५-२६ या रिपोर्टिंग वर्षापासून लागू आहे. त्याचा रेकॉर्ड २०२६-२७ च्या एपीएआर चक्रात येईल.

सरकारी अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंगचा अभ्यासक्रमही बदलत आहे. आता अधिकारी एआय, जनरेटिव्ह एआय, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, सायबर सुरक्षा, डेटा प्रायव्हसी, ड्रोन, इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजेच आयओटी व ब्लॉकचेनचाही अभ्यास करतील. एवढेच नाही तर सोशल मीडियावरील संकटाची स्थिती व चुकीची माहितीला कसे हाताळायचे यालाही सरकारी प्रशिक्षणाचा भाग बनवले आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या २०२६-२७ च्या स्टेट कॅटेगरी ट्रेनिंग कॅलेंडरच्या दिव्य मराठी नेटवर्कच्या पडताळणीत या बदलाची माहिती मिळाली आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना निश्चित डिजिटल कोर्सपैकी ५०% पूर्ण करावे लागणार

१. कक्षेत कोणते कर्मचारी? केवळ आयएएस किंवा वरिष्ठ अधिकारीच नाही, तर केंद्र सरकारचे सर्व कर्मचारी,ऑल इंडिया सर्व्हिसेसचे सर्व अधिकारी कक्षेत असतील. २. कोर्सचा काय नियम? सरकारी कर्मचाऱ्यांना मंत्रालय किंवा केडर कंट्रोलिंग अथॉरिटीद्वारे वर्षासाठी निर्धारित केलेल्या कोर्सपैकी किमान ५०% पूर्ण करावे लागतील. ३. एपीएआरमध्ये नोंदी कशा? हा रेकॉर्ड कर्मचाऱ्याद्वारे वेगळा नोंदवला जाणार नाही. आयगॉटवरून स्टेटस थेट परफॉर्मन्स रिपोर्टमध्ये दिसेल. ४. कॉम्पिटन्सी पासबुक का? ग्रेड मिळवल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संपादीत क्षमता,कोर्सचा रेकॉर्ड या डिजिटल पासबुकमध्ये नोंदवणार ५. एपीएआर कसे जोडणार? ही माहिती स्पॅरो म्हणजेच स्मार्ट परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट रेकॉर्डिंग ऑनलाइन विंडोद्वारे जोडण्याची तयारी आहे. ६. मंत्रालयांना काय लाभ आहेत? यामुळे हे पाहण्याचा डिजिटल आधार तयार होईल की, कोणी निश्चित क्षमता मिळवली आणि कोणत्या कर्मचाऱ्याचे ट्रेनिंग अजून बाकी आहे. ७. अनुत्तीर्ण झाल्यास काय? एखादा कर्मचारी अनुत्तीर्ण झाल्यास असेसमेंट पास करण्यासाठी संधी मिळतील. ८. प्रयत्न संख्या नोंदवणार? नाही. एपीएआरमध्ये प्रयत्नांची संख्या नोंदवली जाणार नाही, केवळ कर्मचाऱ्याचे असेसमेंट क्लिअर झाले की नाही हे दिसेल. ९. रेकॉर्डच्या पुढे काय शक्य? प्रमोशन, एम्पॅनेलमेंट याबाबत अद्याप स्पष्टता नाही. १०. मिसइन्फॉर्मेशन का जोडले गेले अभ्यासक्रमात? सोशल मीडिया काळात एखाद्या संकटा वेळी माहिती हाताळणे, सरकारची बाजू मांडण्यासाठी व चुकीच्या माहितीचा सामना करण्यासाठी जोडले आहे. ११. सायबर सुरक्षेत काय? यात डेटा प्रायव्हसी, सायबर हायजीन, सायबर क्राइम्स, डिजिटल सेफ्टी कायद्यांशी संबंधित कार्यक्रम जोडले आहेत. १२. रिपोर्ट कार्ड कसा बनेल? एक भाग अधिकाऱ्याद्वारे मूल्यांकनातून बनेल, तर ट्रेनिंग व क्षमता बांधणीचा रेकॉर्ड त्याच्या डिजिटल फूटप्रिंटने नोंदवतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *