Headlines

'सरसकट मदत' ऐवजी पंचनामे का?:बावनकुळे यांनी मांडले तांत्रिक वास्तव; केंद्राच्या मदतीसाठी अचूक पंचनामे अनिवार्य, चारा-पाणी नियोजनावर भर




“राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. दुष्काळाच्या भीषण संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे कोणत्याही राष्ट्रीयीकृत, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC) किंवा पतसंस्थेने कर्जवसुलीचा तगादा लावू नये. तसेच संकटाचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या अवैध सावकारांना सरकार सोडणार नाही,” असा सक्त आणि कडक इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुष्काळी उपाययोजना, अचूक पंचनाम्यांची गरज, मुंबईतील राजकीय आंदोलने आणि शरद पवारांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुष्काळात चारा आणि पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर बोलताना बावनकुळे म्हणाले, राज्यात आतापर्यंत 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, उर्वरित वंचित तालुक्यांचे फेरसर्वेक्षण करून आज-उद्या त्यामध्ये आणखी काही तालुक्यांचा समावेश केला जाईल. केवळ आर्थिक मदत देऊन भागणार नाही, तर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि जनावरांसाठी चारा छावण्या व चाऱ्याची उपलब्धता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आगामी काळातील टंचाई लक्षात घेऊन जलसंधारणाची कामे हाती घेतली जातील आणि पिण्याच्या पाण्याचे साठे अधिक मजबूत केले जातील. शेतकरी, शेतमजूर आणि १८ पगड जाती-बारा बलुतेदारांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने काम करत आहे. बँका आणि सावकारांना थेट इशारा कर्जवसुलीवरून शेतकऱ्यांवर येणाऱ्या दबावाबाबत बावनकुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “शेतकऱ्यांसोबत बँकांचे वागणे योग्य नसल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. पतसंस्था, सहकारी बँका, खाजगी किंवा राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावू नये. अवैध सावकारांनी दुष्काळात शेतकऱ्यांना लुटण्याचा किंवा फसवण्याचा प्रयत्न केल्यास सरकार त्यांचे कंबरडे मोडेल, त्यांना अजिबात सोडले जाणार नाही.” ‘सरसकट मदत’ ऐवजी पंचनामे का? बावनकुळे यांनी मांडले तांत्रिक वास्तव नुकसान सर्वदूर असताना पंचनाम्यांचा घोळ कशासाठी, या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी केंद्र सरकारच्या नियमावलीचा दाखला दिला. “राज्य सरकार केंद्राच्या मदतीची वाट न पाहता स्वतःची मदत देणारच आहे. मात्र, एनडीआरएफच्या निकषांनुसार केंद्राकडून राज्याला मिळणारी हक्काची मदत अत्यंत मोठी आणि आवश्यक असते. जर आपण निकषात बसलो नाही, तर संपूर्ण आर्थिक भार राज्यावर पडतो.” “केंद्राची पाहणी पथके जेव्हा दौऱ्यावर येतात, तेव्हा त्यांना अचूक पंचनाम्यांचे अहवाल, ट्रिगर-1 आणि ट्रिगर-2 चे निकष तसेच ड्रोन सर्व्हेचा डेटा सादर करावा लागतो. त्यामुळे महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तिन्ही विभागांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन कोणताही घोळ न करता अचूक पंचनामे करावेत, अशा सूचना सर्व मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत.” मुंबईला वेठीस धरू नका; आंदोलने राजकीय नसावीत निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून मुंबईत सुरू असलेल्या विविध आंदोलनांवर भाष्य करताना ते म्हणाले, “आंदोलन करणे हा लोकशाहीतील अधिकार असला, तरी त्याला निव्वळ राजकीय स्वरूप देऊन राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये. ज्या मुद्द्यांवर आंदोलन केले जात आहे, त्याचे अधिकृत स्पष्टीकरण यापूर्वीच समोर आलेले आहे. राजकीय स्वार्थासाठी मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीला कोणीही वेठीस धरू नये,” असे आवाहन त्यांनी आंदोलक संघटनांना केले. शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर भाष्य ज्येष्ठ नेते शरद पवार दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यावर निघाले असल्याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, “दुष्काळात जनतेच्या पाठीशी उभे राहणे ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनीही मते घेतली आहेत, त्यामुळे संकटकाळात त्यांनी जनतेमध्ये जाणे यात काही गैर नाही. काही लोक केवळ प्रसिद्धी आणि दिखाव्यासाठी दौरे करतात. दिखाऊपणा न करता सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकरी आणि कष्टकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी एकत्र आले पाहिजे,” असे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. —————————————————— हेही वाचा… पूर्णेकर हत्येच्या आरोपांवर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार: ऑडिओ क्लिप AI जनरेटेड; दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंना अटक का झाली नाही? ठाण्यातील चितळसर-मानपाडा (प्रभाग क्र. ३) येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून ठाकरे गटाकडून होणाऱ्या गंभीर आरोपांवर शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “प्रदीप पूर्णेकर यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असून त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मात्र, या दुःखाचा गैरफायदा घेत मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे घाणेरडे राजकारण उबाठा गट करत आहे. मूळ एफआयआरमध्ये (FIR) आमचे नाव नसताना केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एका महिलेला आणि तिच्या पतीला यात गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे करत आहेत,” असा घणाघाती आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *