![]()
ज्येष्ठ अभिनेते आणि समाजातील प्रश्नांवर कायम परखडपणे मत मांडणारे नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पुण्यात विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. नानांना श्रद्धांजली वाहताना रोहित पवारांनी एक अत्यंत भावुक आणि खासगी आठवण शेअर केली आहे. अवघ्या तीन-चार दिवसांपूर्वीच नानांनी या विद्यार्थी आंदोलनाला भेट देण्याचा शब्द दिला होता, मात्र ही भेट आता कायमची अपूर्णच राहिल्याची खंत त्यांनी भरल्या अंतःकरणाने व्यक्त केली. आंदोलनात येण्याचा तो शब्द अपूर्णच… नाना पाटेकरांसोबतच्या शेवटच्या संवादाची आठवण सांगताना रोहित पवार म्हणाले, “तीन-चार दिवसांपूर्वीच एका मित्राच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोललो होतो. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन हक्काचे असून, आपण या आंदोलनाला भेट द्यायला यावे, अशी विनंती मी त्यांना केली होती. त्यावर नानांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. ‘मी सध्या थोडा बाहेर आहे, पण हे विद्यार्थ्यांचे हक्काचे आंदोलन जर पुढेही सुरू राहिले, तर पुढच्या तीन-चार दिवसांत मी नक्कीच तिथे येईन,’ असा शब्द त्यांनी दिला होता. पण आज सकाळी उठल्या-उठल्याच ही दुःखद बातमी कळाली आणि ती भेट कधीच होऊ शकणार नाही, याची मोठी खंत वाटते.” ‘मनात एक आणि ओठात एक कधीच नसायचे’ नानांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक करताना रोहित पवार म्हणाले, “नानांचे जाणे हे सर्वांसाठीच अतिशय दुःखद आहे. सामाजिक क्षेत्र असो किंवा कलाक्षेत्र, त्यांनी खूप मोठे नाव कमावले होते. त्यांच्या मनात एक आणि ओठात एक असे कधीही नसायचे. मी अनेकदा त्यांच्यासोबत जवळून चर्चा केली आहे.” नानांचे आणि पवार कुटुंबाचे असलेले जुने संबंध सांगताना ते म्हणाले की, आदरणीय पवार साहेबांसोबत त्यांचे नेहमीच बोलणे-उठणे-बसणे असायचे, तसेच ते दादांचेही जिवलग मित्र होते. मराठी माणसाचे मोठे नुकसान प्रहार’ आणि ‘खामोशी’ सारख्या उत्कृष्ट चित्रपटांमधून नानांनी समाजाला दिलेला संदेश कायम महत्त्वपूर्ण राहील, असे रोहित पवार म्हणाले. “त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या परिवारासोबत आहोत,” अशा शब्दांत रोहित पवारांनी आपल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने या महान कलाकाराला भावपूर्ण आदरांजली वाहिली. ———– संबंधित बातम्या वाचा.. नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन:100 हून अधिक चित्रपट, 3 राष्ट्रीय, 4 फिल्मफेअर पुरस्कार; कारगिल युद्धादरम्यान सैन्यासोबत होते ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या गोव्यातील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर सुमारे 45 मिनिटे सीपीआर (CPR) देण्यात आले, परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही. डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचे पहाटे 5वाजून 20 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वैद्यकीय-कायदेशीर खटला (MLC) दाखल करण्यात आला असून, शवविच्छेदन केले जाईल. सविस्तर वाचा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन:संवेदनशील, अष्टपैलू अन् करारी अभिनेता गमावला; नानांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू, दिग्गज आणि आपल्या सखोल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी गोव्यातील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील घरी असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा
Source link