Headlines

सहानुभूती नव्हे, संधी द्या; दिव्यांगांच्या विकासासाठी महापालिकेचा पुढाकार:विद्यार्थ्यांच्या गायनाने पाहुणे मंत्रमुग्ध; स्वतंत्र केंद्रासाठी जागा देणार‎



दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये अफाट बुद्धिमत्ता, चातुर्य आणि विविध कौशल्ये असतात. त्यांना योग्य संधी आणि सुविधा मिळाल्यास तेही समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुढे जाऊ शकतात. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने

.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग, रिमांड होम आणि रेणुकानगर केंद्राच्या वतीने मंगळवारी मनपा आयुक्तांच्या दालनात दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक किट आणि कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले. महापौर ज्योती गाडे, आयुक्त डांगे आणि उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते हे वाटप झाले.

आयुक्त डांगे म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी विशेष शिक्षक मेहनत घेत आहेत. त्यांच्या कार्याला महानगरपालिकेकडून आवश्यक सहकार्य केले जाईल. स्वतंत्र केंद्रासाठी महापौर व उपमहापौर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. महापौर ज्योती गाडे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक असावा. त्यांना प्रोत्साहन आणि योग्य संधी मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांसह पालकांच्या परिश्रमांचे कौतुक केले. नगरसेवक महेश लोंढे, सतीश शिंदे, पालक व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक उमेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले. पालक गीता टेमक-वामन यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.

आयुक्त डांगे यांच्या दालनात विद्यार्थ्यांचा सुरेल आविष्कार! सामान्यतः शाळांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांपेक्षा वेगळा अनुभव दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळाला. मनपा आयुक्तांच्या दालनात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गायनातून पाहुण्यांचे स्वागत केले. भक्तिगीते आणि भावगीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *