Headlines

संभाजीनगर-सोलापूर मार्गावरील जड वाहतूक 4 दिवस वळवली:कोजागरीनिमित्त तुळजापूर घाटही बंद




कोजागरी पौर्णिमेनिमित्त रविवार, २५ आॅक्टोबर रोजी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सुमारे सात ते आठ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे अपघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत बदल केले आहेत. या काळात एकूण १४ मार्गांवर हलक्या व जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.तुळजापूर घाटही सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांतून भाविक पायी तुळजापूरला येतात. २४, २५ आणि २६ ऑक्टोबरला गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. ड्रोनद्वारे टेहळणी, मोटारसायकलने पेट्रोलिंग कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे येणाऱ्या सात ते आठ लाख पायी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनद्वारे टेहळणी करण्यात येणार असून प्रमुख मार्गांवर मोटारसायकल, जीपच्या माध्यमातून पेट्रोलिंगद्वारे पोलिसांचा वॉच राहणार आहे. मनाईचे मार्ग आणि पर्यायी व्यवस्था



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *