Headlines

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर दुःखाचा डोंगर:मातोश्री शिवकांताबाई गुट्टे यांचे निधन; परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले




शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मातोश्री शिवकांताबाई दत्तराव गुट्टे यांचे निधन झाले आहे. सुषमा अंधारे यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट करत ही दुःखद बातमी दिली असून, त्यांच्या आईच्या जाण्याने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. शिवकांताबाई यांचे निधन वृद्धापकाळाने झाले असून त्यांच्यावर मूळगावी, बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नंदनज येथे सकाळी 8.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या निधनाची बातमी समजताच शिवसैनिक आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी बीडच्या दिशेने धाव घेतली. सुषमा अंधारेंना आजोबांची शिकवण सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. याच आक्रमकतेमुळे त्यांना ‘अंगारवाली बाई’ असेही म्हटले जाते. त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत त्यांचे आजोबा दगडू अंधारे यांचे मोठे योगदान असून, सुषमा याच आजोबांचे नाव आपल्या नावापुढे लावतात. आजोबा त्यांना प्रेमाने ‘रुबाब’ म्हणायचे आणि त्यांनीच सुषमा यांना आयुष्यात ताठ मानेने जगायला शिकवले. मोठा आधारवड हरपला सुषमा अंधारे यांना त्यांच्या आजोबा आणि आईने अत्यंत कष्टातून वाढवले. त्यांच्या मातोश्री शिवकांताबाई या मितभाषी आणि प्रचंड कष्टाळू होत्या. त्यांनी अपार मेहनत घेऊन मुलांना सन्मानाने जगायला शिकवले. सुषमा अंधारे कायम आपल्या संवादात आई आणि आजोबांच्या या संघर्षाचा अभिमानाने उल्लेख करतात. आईच्या निधनाने त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत जवळचा आणि हक्काचा आधारवड आज हरपला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *