Headlines

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा:सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 10 कोटींची मदत




महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या संकटाच्या काळात दुष्काळग्रस्त शेतकरी आणि बाधित नागरिकांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. न्यासाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला 10 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या मदतीमुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मदत होणार आहे. सोमवारी (9 नोव्हेंबर 2026) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या पदाधिकाऱ्यांनी 10 कोटी रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. न्यासाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा असलेले सदानंद सरवणकर आणि कोषाध्यक्ष आचार्य पवनकुमार त्रिपाठी यांच्या हस्ते हा धनादेश मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि आर्थिक अडचणी अशा विविध समस्यांना शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत संकटग्रस्त नागरिकांना मदतीचा हात मिळावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मंदिर न्यासाच्या व्यवस्थापन समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. नैसर्गिक आपत्तीच्या काळात न्यासाचा मदतीचा हात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीच्या काळात राज्यातील नागरिकांना मदत केली आहे. गतवर्षी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, तर अनेक नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यावेळीही मंदिर न्यासाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला 10 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि बाधित नागरिकांच्या मदतीसाठी न्यासाने 10 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात राज्यातील नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा न्यासाने कायम ठेवली आहे. धार्मिक कार्यासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून गरजू नागरिकांना मदत करण्याच्या न्यासाच्या भूमिकेचे या निर्णयातून दर्शन घडते. धनादेश सुपूर्द करताना न्यासाचे पदाधिकारी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनादेश सुपूर्द करताना न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर, कोषाध्यक्ष आचार्य पवनकुमार त्रिपाठी यांच्यासह विश्वस्त मीना कांबळी, महेश मुदलियार, गोपाळ दळवी, जितेंद्र राऊत, मनीषा तुपे, सुदर्शन सांगळे आणि कार्यकारी अधिकारी राखी चव्हाण उपस्थित होते. एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना सिद्धिविनायक मंदिर न्यासाने दिलेल्या 10 कोटी रुपयांच्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहायता निधीला बळ मिळाले आहे. या निधीचा उपयोग दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे संकटाच्या काळात सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात देण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हेही वाचा… ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!:उद्याच होणार निवडणूक, मात्र शासन नियुक्त 4 सदस्यांचे मतदान वेगळे ठेवणार; न्यायालयाचा निर्णय कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर चार शासन नियुक्त संचालक नेमण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयाच्या विरोधात आज कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता न्यायालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *