![]()
पुण्यातील खराडी भागात बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिसांना दोघांनी धक्काबुक्की केली. पोलिसांनी अजय जयकुमार सावंत (वय 35) आणि किसन सूर्यभान झेंडे (वय 32, दोघे रा. बायफ रस्ता, वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी पोलिसांचे पथक टेक्सास टॉवर सोसायटीसमोर गस्त घालत होते. तिथे सावंत आणि झेंडे नशेत गोंधळ घालत होते. पोलिसांनी त्यांना गोंधळ न घालण्यास सांगितले. यानंतर दोघांनी पोलिस उपनिरीक्षक म्हेत्रे आणि पोलिस शिपाई अशोक केदार यांना धक्काबुक्की केली. झटापटीत गणवेशाचे बटण तुटले. केदार यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक एस. सातपुते तपास करत आहेत. मद्य विक्री दुकानाचे कुलूप तोडून रोकड लंपास मद्य विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील 70 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर भागात अतुल वाईन्स हे मद्य विक्रीचे दुकान आहे. दुकानातील गल्ल्यात 70 हजार रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड चोरल्याची घटना नुकतीच घडली. पोलिस उपनिरीक्षक दीक्षित तपास करत आहेत. नऱ्हे भागातील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 70 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध नऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस हवालदार भोरडे तपास करत आहेत. बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी 60 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस हवालदार भुजबळ तपास करत आहेत
Source link
पुण्यात पोलिसांच्या गस्ती पथकावर हल्ल्याचा प्रयत्न:वाघोलीतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल