Headlines

निवृत्तीवेतनधारकांसाठी हयात प्रमाणपत्राची कार्यशाळा:अमरावतीच्या वरिष्ठ कोषागार कार्यालयात उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मार्गदर्शन




निवृत्तीवेतनधारकांना वार्षिक हयात प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी अमरावतीतील वरिष्ठ कोषागार कार्यालयात सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी कार्यशाळा होणार आहे. कॅम्प परिसरातील कोषागार कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत कार्यशाळा होईल. डिजिटल पद्धतीने प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ‘जीवन प्रमाण ॲप’ आणि फेस ऑथेंटिकेशनची माहिती दिली जाईल. प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया, आवश्यक तांत्रिक बाबी, ॲपचा वापर आणि प्रत्यक्ष नोंदणी याबाबत मार्गदर्शन केले जाईल. डिजिटल पद्धतीने प्रमाणपत्र सादर करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशिक्षणही दिले जाईल. सहभागी होणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी आधार कार्ड (मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असलेले), पी.पी.ओ. क्रमांक किंवा निवृत्तीवेतन पुस्तिका, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आणि स्मार्टफोन सोबत आणावा. ओटीपी मिळवण्यासाठी आणि ॲप वापरण्यासाठी स्मार्टफोन आवश्यक आहे. जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांनी कार्यशाळेत सहभागी होऊन डिजिटल पद्धतीने हयात प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया जाणून घ्यावी, असे आवाहन सहसंचालक (लेखा व कोषागारे) आणि वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *