- Marathi News
- National
- Excavation By Machine Near Sheshnag On Amarnath Route; Strong Opposition, People Related To Religion politics environment On One Platform
हारून रशीद | श्रीनगर7 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

पहलगाम येथील पारंपरिक अमरनाथ यात्रा मार्गावर संवेदनशील शेषनाग सरोवर आहे. या सरोवराजवळ जड मशीन्सद्वारे खोदकाम आणि जमीन सपाट करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये संताप पसरला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडिओ वाद वाढल्यानंतर डिलीट केला. या घटनेमुळे मुस्लिम धार्मिक नेते, हिंदू राजकीय प्रतिनिधी आणि पर्यावरण कार्यकर्ते एकाच मंचावर आले आहेत.
मीरवाइज उमर फारूक, एम. वाय. तरिगामी, मेहबूबा मुफ्ती, रुहुल्ला मेहदी यांच्यासह अनेक विद्यार्थी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. हिमालयातील नाजूक परिसंस्थेला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जड मशीन्सचे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. हे खोदकाम सीमा रस्ते संघटनेकडून केल्या जाणाऱ्या अमरनाथ यात्रा कॉरिडॉरच्या विस्ताराशी संबंधित आहे. बीआरओने हे आरोप फेटाळून लावले.
पर्यावरणतज्ज्ञ, अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या प्रमुख चिंता
- हा अस्थिर भूभाग हिमनदीतील सैल गाळ आणि तीव्र उतारांनी वेढलेला आहे. जड मशीन्सच्या कंपनांमुळे आणि खोदकामामुळे भूस्खलन होण्याची भीती आहे.
- शेषनाग सरोवर हे लिद्दर नदीचे प्रमुख उगमस्थान आहे. सरोवराच्या काठावर माती टाकल्याने आणि खोदकाम केल्याने लिद्दर नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम शक्य.
- या क्षेत्रात जड यंत्रसामग्री तैनात करण्यापूर्वी पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाबाबत प्रशासनाने पारदर्शकता पाळली नाही.
८५% भाग संवेदनशील
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी व सर्व्हे ऑफ इंडियानुसार, अमरनाथ यात्रा मार्गाचा ८५% भाग भूस्खलनासाठी संवेदनशील आहे. दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाय हवेत.
अतिसंवेदनशील ग्लेशियर सरोवरांत शेषनागचा समावेश
पर्यावरणतज्ज्ञ सुहैल अहमद यांच्या मते, शेषनाग हे जम्मू-काश्मीरमधील त्या १४ अतिसंवेदनशील हिमसरोवरांपैकी एक आहे, जिथे ‘ग्लेशिअल लेक आउटबर्स्ट फ्लड’चा (सरोवर फुटून येणारा पूर) मोठा धोका आहे. जड मशीन्सचा वापर परिसरात गंभीर आपत्तीचे कारण ठरू शकतो.