Headlines

कार्तिकीसाठी 15 बसेस पंढरपूरला; माढ्यातील 150 विद्यार्थ्यांची गैरसोय:वारीच्या नियोजनाचा विद्यार्थ्यांना फटका; खासगी वाहनांवरच भिस्त



धार्मिक उत्सव आणि वारीच्या नियोजनासाठी एसटी महामंडळाकडून बसेस अन्यत्र वळवल्याने त्याचा थेट फटका शाळकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत आहे. कार्तिकी वारीसाठी कुर्डूवाडी आगारातील बसेस पंढरपूर आगाराकडे पाठविण्यात आल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून माढा

.

माढा शहर तसेच चिंचोली, शिंदेवाडी आणि धनगरवाडी येथील सुमारे १५० विद्यार्थी उपळाई बुद्रुक येथील नंदिकेश्वर विद्यालयात शिक्षणासाठी दररोज एसटीने प्रवास करतात. या सर्व विद्यार्थ्यांनी महामंडळाचा प्रतिमहिना ४८० रुपयांचा पास काढला आहे. मात्र, २० नोव्हेंबरपासून शाळेत जाण्यासाठी नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. माढा शहरातील विद्यार्थ्यांच्या पालकांना पास असूनही खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तर शिंदेवाडी, चिंचोली आणि धनगरवाडीसारख्या ग्रामीण भागात पर्यायी वाहतुकीची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही शक्य झाले नाही. त्यामुळे वारीच्या नियोजनासाठी केलेल्या बस व्यवस्थापनाचा भार विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, आषाढी वारी, कार्तिकी वारी तसेच विविध यात्रांच्या काळात वारंवार बसेस अन्यत्र वळविल्या जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय ही नित्याचीच झाली आहे. नियमित प्रवासासाठी पासचे पैसे भरूनही सेवा मिळत नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बससेवा बंद असलेल्या दिवसांचे पैसे परत द्यावेत किंवा पासची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणीही पालकांकडून होत आहे. दरम्यान, कार्तिकी वारीसाठी कुर्डूवाडी आगारातून १५ बसेस देण्यात आल्याने नियमित फेऱ्या करता आल्या नाहीत. बुधवारपासून सर्व फेऱ्या नेहमीप्रमाणे सुरू होतील, असे आगार व्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, धार्मिक उत्सवांच्या नियोजनात विद्यार्थ्यांच्या नियमित प्रवासाची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. भविष्यात होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी बसव्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी जोर धरत आहे. कार्तिकी वारीसाठी कुर्डूवाडी बस आगारातून १५ गाड्या देण्यात आल्या होत्या. पंढरपूर आगाराने दिलेल्या गाड्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी पाठविल्याने नियमित दैनंदिन फेऱ्या करता आल्या नाहीत. बुधवारपासून सर्व फेऱ्या नेहमीप्रमाणे सुरू करण्यात येणार आहेत. पालकांनी सहकार्य करावे. – रत्नाकर लाड, आगार व्यवस्थापक, कुर्डूवाडी

उद्यापासून सर्व फेऱ्या नियमित सुरू होणार, विद्यार्थी आणि पालकांनी सहकार्य करावे

विद्यार्थ्यांची वारंवार गैरसोय होताना दिसतेय ^माढ्यातून सुमारे ६५ विद्यार्थी शिक्षणासाठी उपळाई बुद्रुक येथे जातात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, आषाढी व कार्तिकी वारी तसेच यात्रांच्या वेळी बसेस अन्यत्र पाठविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. पास असूनही नाइलाजाने खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. कुर्डूवाडी आगाराने विद्यार्थ्यांची वारंवार होणारी गैरसोय टाळण्यासाठी वारी व उत्सवांसाठी इतर आगारांतून बसेस उपलब्ध करून द्याव्यात. – सचिन पिलीवकर, पालक, माढा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *