Headlines

पवार एनडीएसोबत जाणार नाहीत, पण पक्षात दोन मतप्रवाह असू शकतात:सत्तेत जाण्याची घाई झाली असली तरी राजकीय वारसदारांनी विचारांचे भान ठेवावे- संजय राऊत




शरद पवार यांचे संपूर्ण राजकारण धर्मांध शक्तींविरोधात लढण्यात आणि काम करण्यात गेले आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर जिवंत ठेवण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. त्यांचे जे राजकीय वारसदार आहेत, त्यांनी याचे भान ठेवले पाहिजे, आम्हीही ठेवतो. सत्तेत जाण्याची घाई जर काही लोकांना झाली असेल आणि त्यातून हा विषय गुंडाळला जात असेल, तर हे काही योग्य नाही. शरद पवार हे एनडीएसोबत जाण्याची काही भूमिका घेतील असे मला वाटत नाही. पण प्रत्येक पक्षात दोन मतप्रवाह असतात, तसे त्यांच्या पक्षात असू शकतात, हे मी सांगू शकतो, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, ज्या शरद पवारांनी अडचणीच्या काळात नरेंद्र मोदी यांना मदत केली, तुम्हाला संरक्षण दिले, त्यांचा पक्ष आणि घर तुम्ही फोडले; तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मोदींचे पंतप्रधानपद वाचवले, ज्या अमित शहांना तुरुंगात जाण्यापासून वाचवले, त्यांचा पक्ष तुम्ही फोडला. आता ‘विश्रांती करा, आम्ही देश सांभाळू’ असे म्हणत आहेत. मोदींनी जसा देश सांभाळला आहे, त्यामुळे तर लोक रस्त्यावर उतरली आहेत; त्यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे असा काही निर्णय घेतील असे वाटत नाही. 20 आदिवासींचा आक्रोश ऐकला पाहिजे संजय राऊत पुढे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांसोबत माझे काही भांडण आहे का? नाही, त्यांनी मला नोटीस पाठवली पाहिजे. त्यांनी जमीन, डोंगर, तळे, समुद्र घ्यावा, आमचे काही म्हणणे नाही. महायुतीच्या सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या कुवती इतक्या वाढल्या आहेत की ते बेफामपणे घेत सुटले आहेत. राहुल नार्वेकर यांचे आणि माझे संबंध पहिल्यापासून चांगले आहेत, पण त्यांनी 20 आदिवासींचा आक्रोश ऐकला पाहिजे. आदिवासींची जमीन दुसऱ्या कोणाला तरी घ्यायला लावायची आणि मग दुसऱ्याने व्यवहार करायचा, हे सगळे रॅकेट असते. आदिवासींकडे जमीनीचे कागदपत्रे संजय राऊत म्हणाले की, 20 आदिवासींची घरे जेसीबी लावून तोडण्यात आली. त्यांच्याकडे कुळ कायद्यानुसार त्या जमिनीची कागदपत्रे आहेत. सरकारी योजनेतून त्यांना तिथे घरे बांधून देण्यात आली आहेत. त्यांना पर्यायी जागा दिलेली नाही. आपण विधानसभेचे अध्यक्ष आहात, व्यवहार करत असताना काही कायदेशीर भान ठेवायला पाहिजे होते. पैसे देऊन हे सरकार आमदार-खासदार विकत घेतात, पैसे देऊन महाराष्ट्रात न्याय विकत घेतला जातो, तर पैसे घेऊन तुमच्या बाजूने बोलायला लोकांचे काय जाते. आपल्याविषयी तक्रार असणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत राहुल नार्वेकर यांनी चर्चा केली पाहिजे. उल्का महाजन या विषयावर संघर्ष करत आहेत, यावर तुम्ही काही भूमिका मांडली नाही. उद्या जर आमदारांनी या विषयावर अधिवेशनात प्रश्न लावला, तर तोसुद्धा चर्चेला येऊ दिला जाणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकार म्हणून आदिवासी कुटुंबीयांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, पण ते कोणाची बाजू घेत आहेत, तर ज्यांच्याविरोधात तक्रार आहे त्यांची. शिंदे गटाचे लोकं पैशाने विकत घेतले जाणारे लोक संजय राऊत म्हणाले की, ज्या 20 आदिवासींच्या जागा घेतल्या ते शिकलेले नाहीत, त्यांना वाचता येत नाही, त्यांचे अंगठे घेतले आहेत. अजून मी काहीच उघड केले नाही, नार्वेकरांनी माझ्या नादी लागू नये. कोर्टात जाण्याच्या धमक्या किमान मला तरी देऊ नका; आमचे आयुष्य कोर्ट, पोलिस स्टेशनमध्ये गेले आहे, आम्ही चळवळीतील लोक आहोत. कुलाब्यातील महायुतीचा मोठा नेता कोण? शिंदे गटाच्या लोकांसाठी सहानुभूतीने बोलण्याची गरज नाही, ते पैशाने विकत घेतले जाणारे लोक आहेत. म्हणून त्यांना 5 ते 50 लाख रुपये दिले असतील. पण पैसे देणारा मोठा नेता नेमका कोण? ज्यांचे संपूर्ण कुटुंब या प्रचारासाठी उतरले होते, ते कोण आहेत? 50 लाख जे वाटले ते कुठून आले? पैसे देणारा नेता कोण? संजय राऊत म्हणाले की, ईडीने 50 लाख रुपयांच्या अधिकृत व्यवहारामुळे मला कोठडीत टाकले होते. कुलाबा भागातील एका व्यक्तीला निवडणुकीतून माघार घेण्यासाठी जर 50 लाख रुपये दिले असतील, तर त्या माणसाविरोधात गुन्हा दाखल करून यात कोण लाभार्थी होते, हे लोकांसमोर आले पाहिजे. मला माहिती आहे की कोण लोक आहेत ते. आपण जर पैसे दाखवत आहात, तर त्यांनी पैसे देणाऱ्यांचे नाव उघड केले पाहिजे, असे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या व्हिडिओवर बोलताना राऊत यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *