Headlines

भिवंडीत गटार साफ करताना 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू: मनपा आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ घडली घटना



ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात तुंबलेली गटाराची वाहिनी साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली, अशी माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. भिवंडी निजामपूर महापालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळ दुपारच्या सुमारास ही दुर्घटना

.

गटार वाहिनीतील अडथळा दूर करण्यासाठी नेमलेल्या खासगी कामगारांच्या पथकात हे दोघेजण होते. वाहिनीच्या आत उतरून साफसफाईचे काम करत असताना दोघांचाही श्वास गुदमरला आणि त्यांना बाहेर पडता आले नाही.

हायड्रोजन सल्फाइड असतो सर्वात घातक वायू

कुजलेल्या अंड्यासारखा वास येणारा हा वायू अत्यंत विषारी असतो. याचे प्रमाण जास्त असल्यास तो नाकातील गंधज्ञान काही सेकंदांतच बधिर करतो; त्यामुळे कामगाराला पुढे वास येणे बंद होते आणि धोक्याची जाणीव होत नाही. हा वायू थेट मेंदू आणि श्वसनसंस्थेवर आघात करतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *