![]()
महाराष्ट्र राज्य दिव्यांग राजकीय प्रतिनिधित्व अभियानाच्या मागण्यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील दिव्यांग बांधवांना त्यांचे हक्क मिळावेत. त्यांना समाजाच्या तसेच शासनाच्या निर्णय प्रक्रियेत योग्य
.
राज्यस्तरावरील प्रमुख मागण्यांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यात यावे. अनुदानात वाढ व्हावी. राज्यातील विविध प्रकारच्या दिव्यांगांना सध्या सुरू असलेले २,५०० रुपये अनुदान वाढवून ६,००० रुपये करण्यात यावे. या वेळी राज्य जनसंवाद समन्वयक सुधीर कडू, गजानन भिरड, प्रकाश अवचार, तुळशीराम गुंजकर ठेकेदार, वैभव सारसे, मोईन अली, सचिन शेजव, बाळासाहेब नेरकर, श्रीकांत देशमुख, अनिल सरदार, मनोज तेलगोटे, नूरखा शेरखा, कोकाटे, संदीप गवई, हरिदास पाचपोर, गणेश सोनटक्के, गणेश वाकोडे, कृष्णा कोरपे, जनार्दन लोखंडे, अली निसार खान, सुशीला घुगे, खेळकर मॅडम, काशीराम सरोदे, फाळके, मोतीराम गनोजे, अडसुळे आदी दिव्यांग बंधू आणि भगिनी उपस्थित होते.