Headlines

40 वर्षांनंतर आळसुंदे-वरकुटे रस्ता खुला, शेतीची वहिवाट अखेर सुरू: 26 वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांना मिळाली वहिवाट



रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांमध्ये हद्दीवरून वाद, अतिक्रमण आणि न्यायालयीन दावे सुरू होते. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणे शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सुमारे ३०० एकर शेतीची वहिवाट याच मार्गाने होणार होती. मात्र,

.

हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आळसुंदे येथील राणा वाघमारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. उपोषण, आंदोलने, मोर्चे आणि प्रशासनाला निवेदने दिली होती. दरम्यान, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी या प्रकरणातलक्ष घालून दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना नोटिसा देऊन त्यांच्या लेखी व तोंडी बाजू ऐकून घेतल्या. कोणत्याही शेतकऱ्याच्या जमिनीचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकारी मोजणी करून रस्त्याच्या हद्दी निश्चित केल्या. त्यानंतर १४ जुलै रोजी नवीन रस्ता मंजूर करण्याचा आदेश देऊन रस्ता प्रत्यक्ष खुला करण्यासाठी नवनाथ सरवदे यांनी पोलिस बंदोबस्त मिळण्याची मागणी केली होती. त्यानुसार तहसील कार्यालयाने करमाळा पोलिस ठाण्याला पत्र देऊन २६ नोव्हेंबर रोजी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार गुरुवारी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत महसूल विभागाचे अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तात प्रत्यक्ष रस्ता खुला करण्यात आला. या वेळी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल यांच्यासह आळसुंदे व वरकुटे येथील ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. राणा वाघमारे, सरपंच संजय धारक, शहाजी घाडगे, गोकुळ दादा, अशोक घाडगे यांच्यासह ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला. अनेक वर्षांपासून वादात अडकलेला शिवरस्ता गावकरी, अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खुला करण्यात आला

शोले स्टाइल आंदोलन; अंगाला चिखल लावूनही दिले होते निवेदन आळसुंदे-वरकुटे शिवरस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मच्छिंद्र वाघमारे यांच्यासह शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केले होते. त्यानंतर ११ एप्रिल २०२५ रोजी आळसुंदे ग्रामस्थांनी करमाळा-कुर्डुवाडी रस्त्यावर अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी राणा वाघमारे यांनी जेसीबीवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती.

अनेक वर्षांचा प्रश्न सोडवल्याचे समाधान आळसुंदे-वरकुटे शिवरस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवताना दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या लेखी व तोंडी बाजू ऐकून घेतल्या. सुनावण्या घेऊन सर्वांचे म्हणणे समजून घेतले. कोणत्याही शेतकऱ्याच्या जमिनीच्या हक्काला धक्का लागू नये, याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी सरकारी मोजणी करून रस्त्याच्या हद्दी आणि खुणा निश्चित करण्यात आल्या. अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान आहे. दोन्ही गावांतील शेतकऱ्यांची अडचण दूर झाली आहे. – शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *