म्हैसांग परिसरात पोलिसाच्या अंगावरट्रॅक्टर घालण्याचा माफियाचा प्रयत्न:पोलिस अधीक्षक चांडक यांनी घेतली घटनेची गंभीर दखल
प्रतिनिधी | अकोला / बोरगाव मंजू म्हैसांग परिसरात कारवाईसाठी गेलेल्या बोरगाव मंजू पोलिसांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करत उघडपणे दादागिरी केली. शिवीगाळ, धमक्या आणि बेधडक वर्तनामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली. वाळू माफियांकडून पोलिसांना धमकी देणारा या प्रकाराचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आठ दिवसांनी पोलिस प्रशासन खळबळून जागे झाले फिर्यादी पोलिसाने…