वैद्यकीय बिलांसाठी पैशांचा खेळ:सीपीआरमध्ये मोठी कारवाई; हिशेबाची डायरी अंगलट, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एकाचवेळी निलंबन
छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील वैद्यकीय बिल घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतले आहे. बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याच्या आरोपांमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर एकाच वेळी कारवाई होणे ही जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या इतिहासातील…