फुलंब्री, सोयगाव तालुक्यात पेरण्यांना वेग:कापूस, सोयाबीन लागवडीकडे कल, काही ठिकाणी मुसळधार, तर कुठे समाधानकारक पाऊस
जून महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या फुलंब्री आणि सोयगाव तालुक् यांतील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. दोन्ही तालुक्यांत झालेल्या समाधा नकारक पावसामुळे खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्या आणि लागवडीच्या कामांना जोमाने सुरुवात झाली असून बळीराजा सुखावला आहे. सोयगाव तालुक्यात लागवडीच्या हंगामात मजुरांची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून, शेतकऱ्यांना वाढीव मजुरी देऊन कामे…