Headlines

केमिकल दुधाच्या आंतरजिल्हा रॅकेटवर ‘एफडीए’चा प्रहार:पाच जिल्ह्यांत छापे, 1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त; पुणे, अहिल्यानगर, सोलापूर जालन्यात कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून राज्यातील लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कृत्रिम दूध भेसळीच्या आंतरजिल्हा संघटित जाळ्याचा पर्दाफाश केल्याचे सांगण्यात आले. . अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत एकाच वेळी ही धडक…

Read More

हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा:विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई, ठाणे, पालघरसह पुण्यातील घाटमाथ्यावरील शाळाही राहणार बंद

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि लगतच्या भागातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, विविध पावसाळी दुर्घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उद्याही राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला योग्य ते आदेश जारी केले असून, या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी देण्यात…

Read More

सहकार मंत्रालयामुळे सहकार क्षेत्रात सुसूत्रता:सुहास पटवर्धन यांचे मत, सहकार सप्ताहाच्या समारोपात प्रतिपादन

भारत सरकारने ६ जुलै २०२१ रोजी स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयामुळे सहकार क्षेत्रातील विविध विभागांमध्ये सुसूत्रता आली आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत, असे मत महाराष्ट्र हौसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी व्यक्त केले. केंद्रीय सहकार मंत्रालयाला २०२६ मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था,…

Read More

तिसरी ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन 12 जुलैला:शून्य प्लॅस्टिक, शून्य कार्बन वापर; पाळीव प्राण्यांसाठी 'पावाथॉन' शर्यत

गोल्डलिफ एन्टरटेन्मेंटतर्फे तिसऱ्या ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 12 जुलै 2026 रोजी करण्यात आले आहे. सदू शिंदे क्रिकेट मैदानावर ही मॅरेथॉन होणार असून, ती पूर्णपणे इको-फ्रेंडली असेल. आयोजक अथर्व अय्यर यांनी सांगितले की, दुसऱ्या आवृत्तीला मिळालेल्या प्रतिसादानंतर सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा होत आहे. या मॅरेथॉनमध्ये प्लॅस्टिक आणि कार्बनचा वापर शून्य असेल. जंपस्टार्ट…

Read More

पुणे महापौर नागपुरे यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा आढावा:नागरिकांनी आपत्कालीन स्थितीत संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. मुळा-मुठा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महापौरांनी शहरातील विविध भागांतील पर्जन्यमान, पाणी साचलेल्या ठिकाणांची स्थिती, मुळा-मुठा नदीपात्रांतील पाणीपातळीची माहिती घेतली. तसेच, आपत्कालीन परिस्थिती…

Read More

हिंगोलीतील शुभम राजे खून प्रकरणी तिघांना जन्मठेप:न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; मुलीची छेड काढल्याच्या वादातून झाली होती हत्या

हिंगोली शहरातील एका तरुणाच्या खून प्रकरणात तिघांना जन्मठेप व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस.एन. माने-गाडेकर यांनी सोमवारी ता ६ दिला आहे. याबाबत जिल्हा सरकारी वकील ॲड एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील तलाब कट्टा भागांमध्ये ता. 18 एप्रिल 2022 रोजी रात्री 9:30 ते 9:45 शुभम राजे…

Read More

काय ऑपरेशन टायगर लावले आहे? लाजा नाही वाटत?:अमित ठाकरे संतापले, मिसिंग लिंक प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवरही टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या एकंदरीत परिस्थितीवर भाष्य करताना संताप व्यक्त केला आहे. काय ऑपरेशन टायगर लावले आहे? लाजा नाही वाटत? उघडपणे तुमच्या तोंडावर लोक मरतायत आणि आपण पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडतोय. निर्लज्जपणे सगळं सुरू आहे, अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी टीका केली आहे. अमित ठाकरे म्हणाले, भीषण परिस्थिती…

Read More

मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली:सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस प्रशासन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी पाहणीनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाला….

Read More

दूध भेसळ रॅकेट उघड, टोळीवर गंभीर गुन्हा दाखल:पुणे ग्रामीणमध्ये सखोल तपास सुरू, आरोग्याशी खेळ उघड

पुणे ग्रामीणमधील मंचर पोलिस ठाण्यात दूध भेसळीच्या एका संघटित रॅकेटवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत फसवणूक, बनावटपणा आणि कट रचण्यासह अनेक गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. तपास यंत्रणांनी हा प्रकार केवळ निकृष्ट दर्जाचे दूध विकण्यापुरता मर्यादित नसून ग्राहकांच्या आरोग्याशी जाणीवपूर्वक खेळ केल्याचा…

Read More

भाजपला दोष देऊ नका, यंदा अभूतपूर्व पाऊस:मुंबईतील दुर्घटनांवरून विरोधकांच्या टीकेला आमदार कालिदास कोळंबकरांचे उत्तर

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. वादळी वारे आणि ढगफुटीसदृश पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. या आपत्कालीन परिस्थितीवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाला धारेवर धरले असतानाच, भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळत…

Read More