माऊली अन् तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता:संभाजी भिडेंच्या विधानावर शरद पवार गटाचा संताप; वारकऱ्यांतील कथित घुसखोरांवर भाष्य
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांविरोधातील आपल्या मोहिमेंतर्गत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या मनू हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्याहून श्रेष्ठ होता या जुन्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. मनू हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्याहून श्रेष्ठ होता, असे विधान केल्यानंतरही आम्ही गप्प बसायचे का? असा सवाल या पक्षाने…