Headlines

नाशिक हिरावाडीत ज्वेलर्समध्ये गोळीबार, दरोडा:भरवस्तीत रात्री 9 वाजता न्यू समृद्धी ज्वेलर्समध्ये धुमाकूळ, कर्मचारी जखमी, दुकानमालक महिलेचा रुद्रावतार

हिरावाडीतील भरवस्तीत रात्री 9 वाजता सराफ दुकानात 6 बंदुकधारी शिरले. त्यांनी बंदुका रोखत दुकानातील तिघांना मारहाण केली आणि गोळीबार करून दागिने लुटून पसार झाले. यात एक कर्मचारी जखमी झाला. रात्री उशिरा पंचवटी पोलिसांनी दोन दरोडेखोरांना ताब्यात घेतले. या घटनेत दुकान मालक नयना पगारिया यांनी जोरदार प्रतिकार केला. नयना पगारिया यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. हिरावाडीत…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:नाशिक म्हाडा प्रकरण, अधिकारी तुरुंगात तरी निलंबनास टाळाटाळ; 10 दिवसांपासून काजळे, पाटील गजाआड

म्हाडा फसवणूक प्रकरणी पोलिसांनी भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन काजळे, नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील आणि महसूलचे नायब तहसीलदार नितीन पाटील या अधिकाऱ्यांना गजाआड केले आहे. 10 दिवस उलटूनही त्यांचे अद्याप निलंबन न केल्याने प्रशासकीय कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. शासकीय नियमांनुसार, कोणताही अधिकारी 48 तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत राहिल्यास तो निलंबित मानला…

Read More

अकोलेकर हैराण:रात्री उशिरापर्यंत असतो 31 अंशांवर पारा; बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे रात्रभर उकाडा

शहरात गत तीन दिवसांपासून अकोलेकरांना दिवसासह रात्रीही असह्य उकाडा व गरम झळांचा सामना करावा लागत आहे. यामागे हवामानाचा बदललेला पॅटर्न व वाढते शहरीकरण हे प्रमुख कारण आहे. सिमेंट काँक्रीटची बांधकामे दिवसा उष्णता शोषून रात्री हळूहळू बाहेर सोडत असल्याने रात्री उशिरापर्यंत ३१ अंशांवर तापमान रहात असून पहाटेपर्यंत उकाडा जाणवत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात १९…

Read More

आषाढीला पंढरपूर जाणाऱ्या मानाच्या पालख्यांची संख्या वाढवण्याची मागणी:विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांतून कौंडण्यपूरच्या एकाच पालखीला मान‎

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील वारीकरिता मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रती दिंडी वीस हजार रुपये अनुदान देण्यास शासनाने १६ जुलै २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे मान्यता प्रदान केली आहे. मात्र, शासनाने ज्या दह . शिवाय दिंड्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम नोंदणीकृत दिंड्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने मोठ्या संख्येने अकरा जिल्ह्यांतून दिंड्या जमा होतील. ह्या दिंड्यांचे…

Read More

लग्नाला 100 दिवसही झाले नाहीत, तोच ट्रॅव्हल्सच्या धडकेत नवदाम्पत्य ठार:अमरावती-बडनेरा एक्स्प्रेस हायवेच्या वडूरा लेन कटींगजवळील घटना‎

अवघ्या तीन महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यासाठी अमरावतीवरुन पुण्याकडे जाणारी खासगी बस काळ बनली. या बसने दिलेल्या धडकेत नवदाम्पत्याच्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी झाली. पाळा येथील हे नवदाम्पत्य दुचाकीने वलगाववरुन पाळा येथे जाण्यासाठी अमर . बडनेरालगतच्या पाळा येथील पुरण कौशल कोठार (वय २९) आणि त्यांची पत्नी वैष्णवी पुरण कोठार (वय २७) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नवदाम्पत्याचे…

Read More

उजनीतील गाळ उपशाचे ठरलं:शेतकऱ्यांना जमीन सुपिकतेसाठी होणार उपलब्ध, गाळमिश्रित वाळू वेगळी करून मक्तेदाराला विक्रीची मुभा

. राज्यातील धरणांची कमी होत चाललेली पाणी साठवण क्षमता आणि अनियंत्रित वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उजनीसह सहा मोठ्या प्रकल्पांमधून प्रायोगिक तत्त्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उजनी धरणात सध्या तब्बल १९.२५ टीएमसी गाळ साचला असून, या निर्णयामुळे कागदावरचे पाणी खऱ्या अर्थाने धरणात साठण्यास मदत होणार…

Read More

मोहोळ तालुक्यात पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा

ग्रामीण भागाचा विकास आणि शेतकऱ्यांची सोय याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने आणि दिलेल्या वेळेतच पूर्ण करा, अशा कडक सूचना आमदार राजू खरे यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. मोहोळ तहसील कार्यालय येथे आयोजित विशेष बैठकीत ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना’ अंतर्गत मतदारसंघातील विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला,…

Read More

तीव्र उन्हामध्ये कांदा काढणीला आला वेग

सध्या बाजारात कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसला, तरी “शेती थांबत नाही’ हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील शेतांमध्ये सध्या कडक उन्हाची पर्वा न करता कांदा काढणीची मोठी लगबग सुरू आहे. परिसरातील आळे, संतवाडी, कोळवाडी, लवनवाडी, राजुरी, तांबेवाडी, बोरी बुद्रुक, पिंपळवंडी, काळवाडी, उंब्रज नंबर एक व दोन या गावांमध्ये मजुरांच्या साहाय्याने…

Read More

कृषी कार्यालयाला रस्ताच नाही; निधी मंजूर, तरी कामासाठी मुहूर्त मिळेना:2.20 कोटींचा निधी कागदावरच, पावसाळ्यापूर्वी कामाची शेतकऱ्यांची मागणी‎

कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील लाखो शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य अंग असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका व बीजगुणन केंद्र या कार्यालयांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने ही तिन्ही कार्यालये दुर्गम बेट . अनिल सिरसाठ, कडूबा पवार, प्रविण काशिनंद, प्रल्हाद लोखंडे, अंकुश सोनवणे, बाळकृष्ण पगारे, धिरज नगराळे, आकाश बोलधने या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी…

Read More

मनमाड-नांदगाव रस्त्यावर इंधन टँकरच्या बेशिस्त पार्किंगमुळे अपघातांची मालिका:पानेवाडी-नागापूर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा टँकरच्या रांगांमुळे वाहतूक कोंडी‎

मनमाड-नांदगाव मार्गावरील पानेवाडी आणि नागापूर परिसरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. या महामार्गावर असलेल्या इंधन प्रकल्पांसमोर दोन्ही बाजूंनी टँकर चालक आपले टँकर अत्यंत बेशिस्तपणे उभे करत असल्याने दररोज . वाहतुकीला अडथळा येत असल्याने कोंडी हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाड्याला नाशिक व मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे वाहनांची मोठी…

Read More