Headlines

आंबेगाव बुद्रुक हादरले:किरकोळ वादातून सुनेने घेतला वृद्ध सासूचा जीव, पुणे पोलिसांकडून आरोपी अनुपमा शिंदेला अटक

पुणे येथील भारती विद्यापीठ परिसरात कौटुंबिक वादातून एका सुनेने 82 वर्षीय सासूचा स्वयंपाकघरातील सुरीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली आहे. खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव सुमन अण्णासाहेब शिंदे (वय 82, रा. समृद्धी रेसीडन्सी, आंबेगाव बुद्रुक) असे आहे. अनुपमा संजय शिंदे (वय 60) असे…

Read More

Maharashtra CM Fadnavis Orders Foreign Travel Ban

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या इंधन टंचाईच्या आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मंत्री आणि वरिष . विविध सरकारी कामांसाठी किंवा अभ्यासाच्या नावाखाली परदेशात जाणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संख्येवर यामुळे मोठा परिणाम होणार आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी आणि…

Read More

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात:चालकाला हृदयविकाराचा झटका आला, नियंत्रण सुटले अन् बस उलटली; प्रवाशी थोडक्यात बचावले

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आज एक थरारक आणि भीषण अपघाताची घटना घडली. नाशिकहून मालेगावाकडे जाणाऱ्या एका एसटी बसच्या चालकाला गाडी चालवत असतानाच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस महामार्गालगतच्या झाडावर जाऊन जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या धडकेमुळे एक मोठे झाड मुळासकट उन्मळून पडले असून बसचेही…

Read More

तटकरे – पवारांच्या भेटीवर राजकीय वावड्या:चर्चा रंगवण्यात अर्थ नाही -पाटील; भेटीचा राजकीय संदर्भ काढण्याची गरज नाही – बावनकुळे

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. एनसीपीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची कथितपणे हकालपट्टी केल्यानंतर तटकरेंनी ही भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क रंगले आहे. पण तटकरेंनी ही केवळ सदिच्छा…

Read More

मोठी बातमी:मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, नांदेड, नाशिकसह जळगावात एटीएसचे छापे; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील तरुण रडारवर

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई सुरू केली असून राज्यातील विविध शहरांमध्ये एकाचवेळी धाडसत्र राबवण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गँगस्टरविरोधात एटीएसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून अनेक ठिकाणी चौकशी आणि तपास…

Read More

सोलापुरात वकिलाच्या कारमधून 1.90 कोटी किमतीचे 950 ग्रॅम ‘मेफेड्रोन’ जप्त:दाेन आरोपी फरार, दोघांना अटक करून पोलिस कोठडी

सोलापूर शहरातील एका वकिलाच्या कारमधून 950 ग्रॅम ‘मेफेड्रोन’ ड्रग्ज (एमडी) जप्त करण्यात आली. ज्याची किंमत 1 कोटी 90 लाख रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीसह चौघांवर गुन्हा दाखल केला. पैकी दोघांना अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. इतर दोघे फरार आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत…

Read More

आमदारकीच्या शेवटच्या दिवशी अमोल मिटकरी भावूक:अखेरचा दिवस, मिटकरी देवगिरी बंगल्यावर; सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ आज संपत असून त्यानिमित्ताने त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या आमदारकीच्या शेवटच्या दिवशी मिटकरी हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर पोहोचले. याचवेळी त्यांच्या जागी विधान परिषदेची उमेदवारी झिशान सिद्दीकी यांना जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे…

Read More

पुण्यात स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेच्या कामाला सुरुवात:पहिल्या 'सेगमेंट कास्टिंग'चे उद्घाटन, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

पुणे शहरातील बहुप्रतीक्षित स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या ‘सेगमेंट कास्टिंग’च्या कामाला मंगळवारी सुरुवात झाली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे या विस्तारित मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता गती मिळणार आहे. स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग दक्षिण पुण्याला शहराच्या मुख्य भागाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गिकेचे काम सुरू…

Read More

महामार्गालगतचे फुटपाथ गायब, रस्त्यावरच पार्किंगचा विळखा!:शहरातील महामार्गांचा श्वास कोंडला, वारंवार वाहतूक कोंडीचे चित्र‎

अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या महामार्गांची स्थिती सध्या अत्यंत भयावह झाली असून, पादचाऱ्यांसाठी असलेले फुटपाथ बहुतांश ठिकाणांहून पूर्णपणे गायब झाले आहेत. अनेक व्यावसायिक आस्थापनांनी महामार्गालगत अनधिकृत बांधकामे केल्याने पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे . विशेषतः तारकपूर परिसरात खासगी रुग्णालयांचे जाळे आहे. यातील बहुतांश रुग्णालयांकडे स्वतःची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उपलब्ध असतानाही, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आपली वाहने महामार्गावरच…

Read More

निदा खान प्रकरण तापलं; मतीन पटेलवर कारवाईनंतर इम्तियाज जलील आक्रमक:एमआयएमला लक्ष्य केलं जातंय? प्रशासनावर निशाणा

नाशिकमधील कथित धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. महापालिका प्रशासनाने पहाटेच्या सुमारास नारेगाव परिसरातील मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर चालवत अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. काही दिवसांपूर्वीच या घराला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने…

Read More