विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल:ठाणे ते नागपूरपर्यंत रंगणार मोठा राजकीय रणसंग्राम; निवडणुकीत कोणाची बाजी?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली असून, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागा भरण्यासाठी प्रक्रिया गतीमान झाली आहे. यासोबतच, विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार असल्याने त्या जागांसाठीही पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात…