Headlines

गांधीग्राम मार्गावरील पुलाची उंची वाढवा; उद्यापासून ठिय्या आंदोलन:पावसाळ्यात पूर आल्यानंतर तुटतो संपर्क; विद्यार्थी, रुग्णांचे हाल‎

बोरगाव वैराळे ते अंदुरा मार्गावरील मोर्णा नदीवरील पुलाची उंची वाढवण्याच्या मागणीसाठी मंगळवार, ११ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. पुलाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देऊन तातडीने प्रत . बाळापूर तालुक्यातील अंदुरा-गांधीग्राम मार्गावरील मोर्णा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने मुसळधार पाऊस आल्यास १८ गावांचा वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येतो. पावसाळ्यात नदीला…

Read More

Nitesh Rane on Ambadas Danve RSS Meet; Jayant Patil & CM Eknath Shinde

मुख्यमंत्र्यांच्या गाडीत किंवा विमानात बसण्याची इच्छा आज प्रत्येकाचीच असते. ‘देवाभाऊंचा’ संवाद लाभणे म्हणजे एक प्रकारे आपले भविष्य घडवण्यासारखे आहे. विमानातील या प्रवासानंतर निश्चितच जयंत पाटलांच्या मनात योग्य आणि सकारात्मक विचार येतील, असे मंत्री नी . नीतेश राणे म्हणाले की, अंबादास दानवे हे मूळचे स्वयंसेवकच होते आणि ते संघाच्या शाखेतही जायचे, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विरोधी भूमिका…

Read More

गणगणे विद्यालयात दिले व्यसनमुक्तीचे धडे:अकोट‎ ग्रामीण पोलिसांनी केले मार्गदर्शन‎

अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील राधाबाई गणगणे विद्यालयात अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनच्या माध्यमातून शाळेचा परिसर नशामुक्त व तंबाखूमुक्त असावा या उद्देशाने अभियान राबवण्यात आले. विद्यार्थ्यांना अकोट ग्रामीण पोलिसांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे दिले. अभियानाबाबतीत येथील शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांसह विविध व्यसनांचे दुष्परिणाम, आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व, तसेच दारू, गुटखा या सारखे अनेक…

Read More

वृक्षसंवर्धनासह शिस्त, देशप्रेम व व्यसनमुक्तीचा संदेश:अहमदपूरच्या यशवंत विद्यालयातील एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी लावले बेलफळ, आंब्याचे झाड‎

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम, शिस्त, देशप्रेम आणि राष्ट्रसेवेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने श्री लोहारे डी. बी. यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अहमदपूरच्या एनसीसी विभागाच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम उ . एनसीसी विभागाच्या प्रमुख श्रीमती मधुबाला आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गौरव चवंडा यांच्या सहकार्याने एनसीसीच्या मुला-मुलींच्या पथकाने या वृक्षारोपण उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी…

Read More

आदिवासी अस्मितेचा जागर; संस्कृतीचा जल्लोष‎:जिल्ह्यात ढोल-ताशांच्या निनादात शोभायात्रा; विविध उपक्रमांतून सामाजिक एकजुटीचे दर्शन‎

कर्मवीर भाऊसाहेब हिरे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी कळवण ते मानूर यादरम्यान तब्बल ५ किलोमीटर प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीत शाळेतील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक उत्साहाने सहभागी झाले होते. . आदिवासी स्वातंत्र्य लढा आणि महान क्रांतीकारकांच्या इतिहासाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या प्रभात फेरीचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत, क्रांतीकारकांच्या घोषणा देत आणि आदिवासी…

Read More

पंढरपूरहून पैठणला परतीच्या वारीचे आगमन:संत एकनाथ महाराज पालखीची चांदीच्या रथातून मिरवणूक‎

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे रविवारी आगमन झाले. यावेळी पाच हजार भाविकांच्या उपस्थितीत चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी, ज्ञानेश महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, रवींद्र महाराज पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीने परतीच्या प्रवासास सुरुवात केली होती. स्वागतावेळी नगराध्यक्षा विद्या कावसानकर, तुषार पाटील, जितूभाऊ परदेशी, गंगाराम महाराज राऊत, रखमाजी…

Read More

संभाजीनगरात इम्तियाज यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी:कार्यकर्त्यांत हाणामारी, लोटालोट करताना वाद, नगरसेवकाला मारहाण

माजी खासदार इम्तियाज जलील यांचा १० ऑगस्टला वाढदिवस… म्हणून ९ ऑगस्टच्या रात्री ११ वाजेपासूनच इम्तियाज यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, एमआयएम नगरसेवक आणि त्यांचे हितचिंतक त्यांच्या घरी जमू लागले. १२ वाजेच्या ठोक्याला इम्तियाज यांना शुभेच्छा देण्यासाठी लोटालोटी सुरू झाली आणि यावरूनच कार्यकर्त्यांत धक्काबुक्की आणि नंतर हाणामारी झाली. काही कार्यकर्त्यांनी एका एमआयएम नगरसेवकाला चोप दिला. मात्र प्रकरण…

Read More

स्वायत्त कॉलेजांचे शुल्क सरकार ठरवणार:संभाजीनगरात ‘नाईक’ व ‘देवगिरी’ ही दाेनच स्वायत्त महाविद्यालये

राज्यातील स्वायत्त (ऑटोनॉमस) महाविद्यालये अवाजवी आणि अनियंत्रित शुल्कवसुली करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या महाविद्यालयांच्या मनमानी शुल्कवसुलीला लगाम घालण्यासाठी राज्य शासन स्वतंत्र शुल्क नियामक प्राधिकरणाची (एफआरए) स्थापना करण्याच्या किंवा विद्यमान ‘एफआरए’कडे हे अधिकार सोपवण्याच्या तयारीत आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार उच्च शिक्षण संचालनालयाने यासंदर्भातील हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती उच्च शिक्षण…

Read More

मंत्र्यांची आई-बहीण काढणाऱ्या जरांगेंवर सर्वपक्षीय नेते गप्प का?:लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल, ओबीसींची वज्रमूठ बांधण्यासाठी उद्या सोलापूर दौरा

राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी आपण सोलापूरमध्ये येणार असल्याची घोषणा केली असून, यावेळी त्यांनी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोलही केला आहे. मनोज जरांगे…

Read More

एडीसीसी बँकेत नव्या सदस्यांच्या मंजुरीवरून वाद:मंत्र्यांच्या निर्णयाला सत्ताधाऱ्यांचे आव्हान, हायकोर्टात जाण्याची तयारी

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) नव्या सभासदांना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविल्याने सत्ताधारी गटात तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे. बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांच्या मते, हा निर्णय चुकीचा आणि कायदेशीर चौकटीत बसणारा नसल्याने येत्या दोन-तीन दिवसांतच त्याला आव्हान दिले…

Read More