पैठणला ४७ शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन:गुणवत्तेला चालना; शिक्षक संघटनांकडून सत्कार
पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ४७ शिक्षकांचे रिक्त पदांवर यशस्वीरीत्या सामायोजन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे संबंधित शिक्षकांना सेवेत स्थैर्य मिळाले असून, शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला मोठा दिलासा मिळणार आहे. ही सामायोजन प्रक्रिया आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख विनोद पाटील बोंबले, पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले,…