Headlines

मोहन भागवतांनी संघाच्या भाषेत सरकारला फटकारले:पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घ्यावी, मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘Gen Z’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला नाही, असे म्हटल्याचा उल्लेख करत देशपांडे म्हणाले की, “संघाच्या भाषेत सरकारला जितके फटकारता येईल तितके मोहन भागवतांनी फटकारले आहे.” पत्रकार परिषदेत बोलताना देशपांडे यांनी…

Read More

BJP Leader Vijay Chaudhary Arrested in Nandurbar; Audio Clip Controversy

नंदुरबारसह संपूर्ण जळगाव आणि धुळे जिल्ह्यांच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या कथित ध्वनीफित प्रकरणी भाजपचे माजी प्रदेश महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांना अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या चौधरी यांना . काय आहे नेमके प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप्स वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत…

Read More

आकाश झांबरे राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष:सुनेत्रा पवार यांनी दिले नियुक्तीपत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या (स्टुडंट विंग) राष्ट्रीय अध्यक्षपदी आकाश झांबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात आकाश झांबरे यांच्यावर पक्षाच्या विद्यार्थी संघटनेची राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नमूद केले आहे. पक्ष…

Read More

पवना पाईपलाईनला मावळमधील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध:राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली 2 ऑक्टोबरला 'लॉन्ग मार्च'ची घोषणा

पवना धरणातून थेट बंदिस्त पाईपलाईन टाकण्याच्या राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेविरोधात मावळ तालुक्यातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून, हजारो शेतकऱ्यांच्या सहभागाने एक विराट ‘लॉन्ग मार्च’ काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.यापूर्वी मावळ येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकरी शहीद…

Read More

शेळ्या-मेंढ्यांसह पशुधन विमा योजना पुन्हा होणार सुरू:दोन दिवसांत जीआर, आमदार बच्चू कडू यांनी केले होते सातत्याने आंदोलन‎

पशुसंवर्धन विभागाने शेळ्या, मेंढ्यांसह पशुधन विमा योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला असून, वन चराईच्या प्रश्नावरही शासनाने सकारात्मक भूमिका घेत पुढील दोन दिवसांत शासन निर्णय (जीआर) जारी करण्याचे आश्वासन दिले आहे. या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी सातत्याने आंदोलन केले केली होती. या निर्णयामुळे राज्यातील लाखो मेंढपाळांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या…

Read More

शहरातील नागरिकांना मूलभूत दर्जेदार सुविधा देण्याची मागणी:न. प. मुख्याधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते शेख आमीन शेख यांचे निवेदन‎

शहरातील नागरिकांना नियमित व दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शेख आमीन शेख हुसेन यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात शहरातील अनेक भागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवणे, शहरात वेळेवर, पुरेसा स्वच्छ पाणीपुरवठा करणे, रस्त्यावरील बंद दिवे तत्काळ सुरू करावे, रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करणे, इतर नागरी मूलभूत…

Read More

भंडाऱ्यात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार:संतप्त जमावाकडून नराधमाला चोप, निषेधार्थ आज 'भंडारा बंद'

भंडारा शहरातून एक अत्यंत माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला आमिष दाखवून तिच्यावर सार्वजनिक शौचालयात अत्याचार करण्यात आला आहे. या भयंकर घटनेनंतर संपूर्ण भंडारा शहरात संतापाचा भडका उडाला असून, नागरिकांनी रस्त्यावर उतरत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज संपूर्ण शहरात ‘भंडारा…

Read More

‘10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियाना’चा शुभारंभ:ब्रह्माकुमारीज संस्थेचा उपक्रम; 20 ऑगस्टपर्यंत चालणार व्यसनमुक्ती मोहीम; उपस्थितांनी व्यक्त केला संकल्प‎

तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि समाजात आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी ब्रह्माकुमारीज संस्थेच्या वतीने ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचा’ उत्साहात प्रारंभ करण्यात आला. संस्थेच्या मुख्य प्रशासिका प्रकाशमणी य . प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर शारदा खेडकर उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, व्यसनमुक्तीचा हा उपक्रम हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी महत्वाचा ठरेल. तर नगरसेवक विनोद मापारी यांनी…

Read More

राज्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरूच:विदर्भात 'येलो अलर्ट', तर जायकवाडी धरण 95 टक्क्यांवर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जुलै महिन्यापाठोपाठ ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने राज्यभरात दमदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, काही भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असली, तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला ‘येलो अलर्ट’ नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज…

Read More

संत बाळूमामा मंदिर ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची मागणी:नांदगावी जय मल्हार सेना व सकल धनगर समाजाचे तहसीलदारांना निवेदन‎

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्टमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच ट्रस्ट बरखास्त करून महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा, २०१८ अंतर्गत प्रशासक नियुक्त क . निवेदनात मंदिर ट्रस्टमध्ये ७० कोटी रुपयांहून अधिक कथित आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित पदाधिकारी आणि विश्वस्तांनी संगनमताने…

Read More