Headlines

शहरातील नागरिकांना मूलभूत दर्जेदार सुविधा देण्याची मागणी:न. प. मुख्याधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते शेख आमीन शेख यांचे निवेदन‎

शहरातील नागरिकांना नियमित व दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शेख आमीन शेख हुसेन यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात शहरातील अनेक भागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवणे, शहरात वेळेवर, पुरेसा स्वच्छ पाणीपुरवठा करणे, रस्त्यावरील बंद दिवे तत्काळ सुरू करावे, रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करणे, इतर नागरी मूलभूत…

Read More

भंडाऱ्यात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार:संतप्त जमावाकडून नराधमाला चोप, निषेधार्थ आज 'भंडारा बंद'

भंडारा शहरातून एक अत्यंत माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला आमिष दाखवून तिच्यावर सार्वजनिक शौचालयात अत्याचार करण्यात आला आहे. या भयंकर घटनेनंतर संपूर्ण भंडारा शहरात संतापाचा भडका उडाला असून, नागरिकांनी रस्त्यावर उतरत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज संपूर्ण शहरात ‘भंडारा…

Read More

‘10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियाना’चा शुभारंभ:ब्रह्माकुमारीज संस्थेचा उपक्रम; 20 ऑगस्टपर्यंत चालणार व्यसनमुक्ती मोहीम; उपस्थितांनी व्यक्त केला संकल्प‎

तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि समाजात आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी ब्रह्माकुमारीज संस्थेच्या वतीने ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचा’ उत्साहात प्रारंभ करण्यात आला. संस्थेच्या मुख्य प्रशासिका प्रकाशमणी य . प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर शारदा खेडकर उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, व्यसनमुक्तीचा हा उपक्रम हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी महत्वाचा ठरेल. तर नगरसेवक विनोद मापारी यांनी…

Read More

राज्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरूच:विदर्भात 'येलो अलर्ट', तर जायकवाडी धरण 95 टक्क्यांवर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जुलै महिन्यापाठोपाठ ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने राज्यभरात दमदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, काही भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असली, तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला ‘येलो अलर्ट’ नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज…

Read More

संत बाळूमामा मंदिर ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची मागणी:नांदगावी जय मल्हार सेना व सकल धनगर समाजाचे तहसीलदारांना निवेदन‎

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्टमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच ट्रस्ट बरखास्त करून महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा, २०१८ अंतर्गत प्रशासक नियुक्त क . निवेदनात मंदिर ट्रस्टमध्ये ७० कोटी रुपयांहून अधिक कथित आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित पदाधिकारी आणि विश्वस्तांनी संगनमताने…

Read More

भांबर्डा गावाजवळ भरधाव टेम्पोच्या धडकेमध्ये 79 वर्षीय महिलेचा मृत्यू:करमाड ते लाडसावंगी मार्गावरील खड्ड्यांनी अपघातात घेतला तिसरा बळी

करमाड-लाडसावंगी मार्गावरील भांबर्डा गावाजवळ टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुचाकीचालक जखमी झाला. गुरुवारी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. छायाबाई पुंडलिक भिसे (७९, रा. निमखेडा, ता. फुलंब्री) असे मृत . छायाबाई भिसे या भांबर्डा येथे एका नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी आल्या होत्या. अंत्यविधी आटोपल्यानंतर त्या व भरत सोळुंके दुचाकी (एमएच २० एफडब्ल्यू…

Read More

आई वडिलांच्या अफाट कष्टामुळे मिळाले यश- सोनू राठोड‎:ऊसतोड मजुराची लेक सोनू राठोड मुंबई पोलिस दलात

कुटुंब अत्यंत गरीब आणि आई-वडील ऊसतोडणीला जातात. जगण्यासाठी दररोजचा संघर्ष असल्याने कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मी पोलिस खाते निवडले. मला मिळालेले हे यश सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने आणि आई-वडिलांच्या अफाट कष्टामुळेच शक्य झाले, अशी प्रांजळ भावना मुंबई पोलिस दलात नव्याने रुजू झालेल्या सोनू मुक्ता विष्णुदास राठोड यांनी व्यक्त केली. नुकतेच मुंबई पोलिस दलात भरती झालेल्या…

Read More

केंद्रबिंदू ईशान्येकडे:नाशकात 12 तासांत 6 भूकंप, मुसळधार पावसामुळे खडकांच्या भेगांत पाणी झिरपले

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी १२ तासांत भूकंपाचे ६ धक्के बसले. यातील ४ धक्क्यांचे केंद्र सुरगाणा तालुक्यातील करंजाळी-उंबरठाण परिसरात होते, तर पहिल्या धक्क्याचे केंद्र नाशिक शहराच्या ईशान्येकडील भागात नोंदवण्यात आले. दरम्यान, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून सुरगाणा, दिंडोरी, कळवण आणि पेठ या तालुक्यांत चार भूकंपमापक यंत्र बसवण्यात येत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्र…

Read More

काॅर्पोरेट जिहाद:न्यायालयात गैरहजेरीमुळे संभाजीनगरचा नगरसेवक मतीन ताब्यात, आराेपी निदा खानला आश्रय, नाशिक पोलिसांची नारेगावात कारवाई

नाशिक पोलिसांच्या पथकाने एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याला गुरुवारी (6 ऑगस्ट) सायंकाळी ताब्यात घेतले आहे. टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला नारेगाव येथे आश्रय दिल्या प्रकरणी त्याच्यावर नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याने त्याचे वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानुसार…

Read More

Mumbai MARD Doctors Call Off Strike After High Court Intervention

मुंबई उच्च न्यायालयाने सरकार आणि ‘मार्ड’ (MARD) प्रतिनिधींना चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश दिल्यानंतर, निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रुग्णालयांमधील ओपीडी, आयपीडी, नियोजित शस्त्रक्रिया, प . सीसीएमपी पात्रता असलेल्या डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाविरोधात हा संप पुकारण्यात आला होता; त्यामुळे संप मागे घेतला असला, तरी…

Read More