Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:पाच महिन्यांत तेल 8, डाळी 6, तर दूध 3 रुपये महागले, रेशनच्या 99% वस्तूंचे भाव वाढले

शनिवार, २८ फेब्रुवारी म्हणजेच ज्या दिवशी अमेरिका-इराण युद्ध सुरू झाले होते… त्या दिवसापासून सोमवार, ३ ऑगस्टपर्यंत सामान्य माणसाचा खाण्यापिण्याचा खर्च वेगाने वाढला आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या प्राइस मॉनिटरिंग सिस्टिमनुसार, या काळात १६ पैकी १५ प्रमुख खाद्यवस्तूंचे भाव वाढले आहेत. यातही सर्वात जास्त वाढ डाळी आणि तेलामध्ये झाली आहे. हरभरा डाळ ४.६५ रुपये, तूर डाळ ५.९६…

Read More

मराठी चित्रपटांना आता जागतिक बाजारपेठ मिळणार:मीडिया शिपर्स, चित्रपट महामंडळाच्या कार्यशाळेत वितरणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

दर्जेदार मराठी चित्रपट तयार होत असले तरी प्रभावी वितरण व्यवस्थेअभावी त्यांना अपेक्षित प्रेक्षक मिळत नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि मीडिया शिपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आता थेट जगाचे मार्केट’ ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमुळे मराठी चित्रपटांसाठी जागतिक वितरणाच्या नव्या संधी खुल्या झाल्या असून, १०० हून अधिक…

Read More

सुनेत्रा वहिनी पवार यांचा अपमान खपवून घेणार नाही:कॉंग्रेसने जाहीर माफी मागावी, सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेलांचा इशारा

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना काँग्रेसने सोशल मीडियावर ‘गुंगी गुडिया’ असा आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात थेट नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच घुसून जोरदार निदर्शने केली. मात्र, या आंदोलनानंतरही सपकाळ यांनी या टीकेचे समर्थन करत ‘सुनेत्रा…

Read More

होमीओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची संधी:याविरोधात डॉक्टरांनी 'ओपीडी बंद' आंदोलन केले

अमरावती: होमीओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी वैद्यकासारखी प्रॅक्टिस करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात स्थानिक डॉक्टरांनी मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी ‘ओपीडी बंद’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश दवाखान्यांमधील ओपीडी सेवा सकाळी ६ वाजेपासून बुधवार सकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या आवाहनानुसार, या ‘ओपीडी बंद’ आंदोलनात जिल्ह्याभरातील सुमारे ११०० डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. अतितातडीची…

Read More

राज्यातील मेट्रो प्रकल्पांना वेग:काम सुरू झाल्यापासून 3 वर्षांत प्रकल्प पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीएच्या शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यास मोठी चालना मिळणार असून भविष्यातील नागरी विकासाला गती मिळणार आहे. या दृष्टीने सदर प्रकल्प काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

दरमहा लाखावर पगार, तरीही चार हजारांसाठी लाचखोरी!:वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, धर्माबाद तालुक्यातील प्रकार

दरमहा सुमारे 1 लाख 5 हजार वेतन घेणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला केवळ 4 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमेश नागोराव मोरे (वय 35) यांच्याविरुद्ध ही कारवाई सोमवारी (3 ऑगस्ट) दुपारी करण्यात आली. तक्रारदार…

Read More

'गुंगी गुडिया' वक्तव्यावर अमृता फडणवीस आक्रमक:म्हणाल्या – महिलांबद्दल अशा प्रकारची हिणकस भाषा वापरणे अत्यंत चुकीचे; सुनेत्रा पवार सक्षम नेत्या

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविषयी वापरलेल्या “गुंगी गुडिया” या शब्दाबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी अमृता फडणवीस यांनी केली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर टीका करत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. अमृता फडणवीस म्हणाल्या की, महिलांबद्दल अशा प्रकारची हिणकस भाषा वापरणे अत्यंत चुकीचे आहे. काँग्रेसने महिलांचा सन्मान राखला पाहिजे. सुनेत्राताई सक्षम नेतृत्व करणाऱ्या…

Read More

श्रीकांत शिंदेंसह शिंदे गटाच्या खासदारांनी घेतली अमित शाहांची भेट:राज्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या इतर खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून या भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावत त्यांचे सहा खासदार आपल्याकडे वळवण्यात शिंदे गटाला यश आले होते. या पार्श्वभूमीवर, दिल्लीत झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीमुळे राज्यात…

Read More

'इतक्या खालच्या स्तराला जाणारे पहिल्यांदाच पाहिले':CM फडणवीसांचे प्रत्युत्तर, एकनाथ शिंदे म्हणाले- सुनेत्रा पवारांचा नव्हे तमाम माता-भगिनींचा अपमान

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत समाचार घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया…

Read More

शेतकऱ्यांच्या साहित्यचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप वाहन, मोटार पंप तसेच इतर शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीचा वालचंदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीसाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर, ट्रॉली, मोटार पंप, केबल वायर आणि इतर साहित्य चोरीच्या घटना वाढल्या…

Read More