Headlines

टिळक पुरस्कारावरून राजकारण चुकीचे:डॉ. रोहित टिळक यांचे संजय राऊत यांच्या 'ईस्ट इंडिया कंपनी' टीकेला प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’मधील अग्रलेखातून टिळक पुरस्कारावर केलेल्या टीकेला टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी यंदाच्या टिळक पुरस्काराला ‘ईस्ट इंडिया कंपनी’ला दिलेला पुरस्कार असे संबोधले होते. डॉ. टिळक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, हा प्रतिष्ठित पुरस्कार सन १९८३ पासून दिला जात आहे….

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘सीजेपी’चे दोन दिवसीय मंथन:लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर येथे ‘कॉक्रोज जनता पार्टी’ (CJP) ची दोन दिवसीय विशेष बैठक सुरू आहे. देशभरातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पक्षाचा पुढील रोडमॅप, संघटना वाढवणे आणि देशासमोरील प्रमुख आर्थिक व सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली जात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. या बैठकीत ‘कॉक्रोज इन्क्लेव्ह’…

Read More

महापौर बंगल्याचा ताजमहाल करायचा आहे का?:मुंबई महापौरांवर आदित्य ठाकरेंची टीका, सिद्धिविनायक प्रकरणावरही साधला निशाणा

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर बंगल्यावरील खर्चावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. महापौर बंगल्याच्या दुरुस्ती आणि वाहन खरेदीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी “महापौर बंगल्याचा ताजमहाल करायचा आहे का?” असा सवाल उपस्थित केला. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “माझ्या दोन्ही…

Read More

काँग्रेसने माफी न मागितल्यास गंभीर परिणाम होतील:सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून माजी खासदारांचा काँग्रेसला इशारा, शरद पवारांनाही आवाहन

माजी खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ‘गुंगी गुडिया’ असा शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी काकडे यांनी केली. माफी न मागितल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत काकडे म्हणाले की, राजकारणात एखाद्या महिलेला ‘गुंगी गुडिया’ म्हणणे अत्यंत…

Read More

राज्यात ‘अ‍ॅनालॉग’ पनीरवर वर्षभर बंदी; वापरल्यास गुन्हा:एफडीए तपासणीत 35.4% नमुने अपायकारक

राज्यभरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या नावाखाली वनस्पतीजन्य चरबीची बेकायदेशीर भेसळ करणाऱ्या माफियांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरातून गोळा केलेल्या ३०८ नमुन्यांपैकी तब्बल १०९ नमुने (३५.४ टक्के) निर्धारित मानकांशी विसंगत आढळले; ज्यामध्ये ३० नमुने थेट मानवी आरोग्यास अपायकारक निष्पन्न…

Read More

पालखी परतीचा सोहळा:पिंपरी-चिंचवडमध्ये 8 व 9 ऑगस्टला वाहतूक बदल; 'हे' आहेत बंद व पर्यायी मार्ग

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी परतीच्या सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात 8 आणि 9 ऑगस्ट रोजी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पालखी मार्गावर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ही अधिसूचना जारी केली आहे. 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते रात्री 8 या वेळेत आळंदीकडे जाणाऱ्या…

Read More

पुणे स्टेशन परिसरात एकाचा खून:पार्किंगमधील रिक्षात अनोळखी व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात एका अनोळखी व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना 3 ऑगस्ट रोजी रात्री घडली. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. बंडगार्डन पोलिसांना रात्री पावणेबाराच्या सुमारास माहिती मिळाली की, रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्किंगमध्ये लावलेल्या रिक्षात एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत पडली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी…

Read More

जिल्ह्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली काढणार- अधीक्षक कुंभार:भूमी अभिलेखच्या आश्वासनानंतर पवळेंचे ठिय्या आंदोलन स्थगित‎

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित करण्यासह प्रलंबित मोजणी प्रकरणांना गती देण्याचे आश्वासन जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख संजय कुंभार यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी पुकारलेले ठिय्या आंदोलन स्थगित केले. शेतरस्त्यांच्या हद्दी स्पष्ट नसल्याने ग्रामीण भागात वारंवार वाद निर्माण होत असून शेतीची कामे अडचणीत येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे…

Read More

"12 गाड्या ओढण्याची' प्रथा रोखा; अंनिसची पोलिसांकडे धाव:वरखेड यात्रेतील प्रथा व पशुबळीविरोधात कारवाईची मागणी‎

नेवासे तालुक्यातील वरखेड येथील महालक्ष्मी देवी यात्रेत दरवर्षी होणाऱ्या कथित ‘१२ गाड्या ओढण्याच्या’ प्रथेवर आणि उघड्यावर होणाऱ्या कथित बेकायदेशीर पशुबळीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्षेप घेत पोलिस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. ७ ऑगस्टच्या यात्रेत ‘अंगात आल्याचा’ आव…

Read More

“एक वृक्ष, एक जीवन’ मोहिमेंतर्गत “आनंदवन’चा हिरवा संकल्प:”दिव्य मराठी”च्या उपक्रमात विविध 175 रोपांचे वृक्षारोपण; 9 वर्षांत 35 हजार झाडांचे हरितविश्व‎

‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष, एक जीवन’ या राज्यव्यापी पर्यावरण जनजागृती मोहिमेंतर्गत पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील आनंदवन परिसरात विविध प्रकारच्या १७५ वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी वृक् . शिक्षक संदीप राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने श्रमदान, लोकसहभाग आणि निसर्गप्रेमाच्या बळावर आनंदवनाची उभारणी केली आहे. आज या…

Read More