Headlines

सुनेत्रा पवारांवरील टीका ही महिला म्हणून नाही, तर उपमुख्यमंत्र्यांच्या मौनावर:प्रश्नांवर लपून बसणारे मोदी-शहा 'गुंगे-गुड्डे' उपमुख्यमंत्र्यांनी तीच भूमिका स्वीकारली का?- राऊत

सुनेत्रा पवार यांचा जो पक्ष आहे तो अमित शहा यांचा पक्ष आहे. ते जसे लपून बसले आहेत ती भूमिका यांनी स्वीकारली आहे का? अमित शहांना आम्ही प्रश्न विचारतो आहे की जंतरमंतरवर लाठीचार्ज आणि कारवाईचे आदेश कोणी दिले पण त्यांनी मौन बाळगले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे दोघेही गुंगा गुड्डे आहे, असे खासदार संजय…

Read More

जिल्ह्यात गतवर्षी 143.3 % पाऊस पडला; यंदा 72.7 टक्क्यांवर मीटर:मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाची टक्केवारी निम्म्यावरच…

मोहोळ गतवर्षी दि. ३ ऑगस्टपर्यंत १४३.३ टक्के एवढा पाऊस पडला आहे. यंदाच्या वर्षी दि. ३ ऑगस्टपर्यंत ७७.२ टक्के पावसाची नोंद झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाची टक्केवारी निम्म्याने घटली आहे. त्यामुळे पेरलेले खरीप जगवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. काही ठिकाणी अधूनमधून होणाऱ्या रिमझिम पावसामुळे पिके तग धरून आहेत. मात्र दमदार पाऊस नाही झाल्यास…

Read More

धनुष्यबाणावर कोणाचा हक्क?:अडीच वर्षांपासूनच्या शिवसेना वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेनेतील फुटीनंतर सुरू झालेल्या पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गेली अडीच ते तीन वर्षे सुरू असलेल्या या प्रकरणाकडे आज संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश…

Read More

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात:कंटेनर, टेम्पो आणि कारची धडक; पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प, सुदैवाने जीवितहानी टळली

पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणजवळील वाकी परिसरात आज पहाटे कंटेनर, टेम्पो आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनर आणि टेम्पोची जोरदार धडक झाल्यानंतर टेम्पो थेट जवळ उभ्या असलेल्या कारवर पलटी झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की कंटेनरही महामार्गावर आडवा झाला. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली. कसा घडला अपघात? मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या…

Read More

16,908 पैकी 183 गोणीला 3,000 हजारांवर भाव:आवक वाढूनही 200 रुपयांची उसळी, कांदा 50 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता‎

वांबोरी उपबाजार आवारात कांद्याच्या दराला दोन दिवसांत चांगलीच उचल मिळाली आहे. ३० जुलैच्या तुलनेत सोमवारी झालेल्या लिलावात प्रतिक्विंटल सुमारे २०० रुपयांची उसळी लिलावात पहायला मिळाली. सुमारे १८३ गोणी कांद्याला ३ हजारांवर भाव मिळाला. एक नंबर कांदा, एकूण सरासरी दर २१०० ते २८०० रुपये मिळाला. ३० जुलै रोजी वांबोरी उपबाजारात १४ हजार ७८५ गोणी कांद्याची आवक…

Read More

खेळणा प्रकल्पात 48 % साठा:सिल्लोडसह 12 गावांवरील पाणी संकट टळले, सततच्या पावसाने पाण्याची आवक, मोठ्या पावसाची प्रतीक्षा‎

तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे स्थानिक जलप्रकल्पांमध्ये समाधानकारक पाण्याची आवक झाली आहे. पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पात सोमवारी ४८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे सिल्लोड शहरासह परिसरातील १२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास तरी सुटला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे मुर्डेश्वर येथील लघु प्रकल्प भरून सांडव्यावरून पाणी वाहू…

Read More

पाचोड परिसरातील लहान-मोठे प्रकल्प पावसाअभावी कोरडेठाक:शेतकरी चिंतेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट, पावसाची प्रतीक्षा कायम‎

ऑगस्ट महिना सुरू झाला तरी पाचोडसह संपूर्ण परिसरात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील लहान-मोठे सिंचन प्रकल्प, नद्या, नाले आणि तलाव अद्यापही कोरडेठाकच आहेत. पावसाच्या या प्रदीर्घ दडीमुळे धरणांमध्ये पाण्याचा थेंबही साचलेला नाही, ज्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जून…

Read More

जामनेर बस स्थानकात एकाच दिवशी महिलेची पर्स, सोन्याची पोत लंपास:चोरीच्या घटना वाढल्या; सावधगिरी बाळगण्याची व्यक्त होतेय गरज‎

येथील बस स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट वाढला असून, एकाच दिवशी दोन महिलांना चोरांनी लक्ष्य केले. यात एका महिलेची पर्स लांबवण्यात आली, तर दुसऱ्या ज्येष्ठ महिलेची सोन्याची मंगलपोत चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बस स्थानकात बसमध्ये चढताना एका महिला प्रवाशाची पर्स चोरट्या महिलेने लांबवली. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात…

Read More

कर्जमाफी योजना प्रभावी अंमलबजावणीसाठी भर:शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे निर्देश‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात बँकेचे चेअरमन विलास संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी कर्जमाफी योजना संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि अंमलबजावणीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी चेअरमन विलास भुमरे यांनी निर्देश दिले की,…

Read More

‘शेवटची भेट, स्टेशनसमोरील लॉज, रूम नंबर 6,’स्टेटस ठेवून कार्यकर्त्याची आत्महत्या:सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साठे यांनी संपवली जीवनयात्रा

‘शेवटची भेट. रेल्वे स्टेशनसमोरील वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या समोरील लॉज, रूम नंबर सहा…’ असा संदेश आणि गळफासाचा फोटो व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवून एका ५१ वर्षांच्या सामाजिक कार्यकर्त्याने लॉजमध्ये गळफास घेत जीवनयात्रा संपवली. मंगळवारी (४ ऑगस्ट) दुपारी तीनच्या सुमारास वेदांतनगर ठाण्यासमोरील मनस्वी लॉजमध्ये हा प्रकार घडला. प्रशांत कचरू साठे (५१, रा. प्रतापनगर, छत्रपती संभाजीनगर) असे या मृत कार्यकर्त्याचे…

Read More