Headlines

काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात तीव्र आंदोलन:महिला नेतृत्वाचा कथित अपमान केल्याने काँग्रेस भवनसमोर घोषणाबाजी

महिला नेतृत्वाबाबत काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पुण्यात जोरदार आंदोलन केले. बालगंधर्व चौकातील झाशीची राणी यांच्या पुतळ्यासमोर तसेच काँग्रेस भवनासमोर घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला. बालगंधर्व चौक, जंगली महाराज रस्ता येथे प्रदीप देशमुख, सुभाष जगताप आणि राजलक्ष्मी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला नेतृत्वाचा सन्मान…

Read More

डॉक्टरांची टंचाई: 'मास्टर चार्ट' शिफारस, खाजगीकरण थांबवण्यावर भर:ग्रामीण वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी धोरणात्मक बदलाची गरज

देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील वैद्यकीय सेवांमधील कमतरता दूर करण्यासाठी आरोग्य यंत्रणेत मोठ्या धोरणात्मक बदलांची गरज व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांची तीव्र टंचाई असलेल्या भागात सरकारी पातळीवर ठोस उपाययोजना आखण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गरजा ओळखून सरकारी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची आणि डॉक्टरांची उपलब्धता वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. या आराखड्यात वैद्यकीय…

Read More

सौरभ गाडगीळ यांच्या 'चुझिंग गोल्ड' पुस्तकाचे प्रकाशन:3 दुकानांवरून 80 शाखांपर्यंत व्यवसाय वाढवण्याचा अनुभव कथन

प्रसिद्ध सराफ सौरभ गाडगीळ यांच्या ‘चुझिंग गोल्ड’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलताना गाडगीळ यांनी आपला व्यावसायिक प्रवास आणि त्यातील अनुभव कथन केले. वारसा केवळ असण्यापेक्षा त्याचा वापर आपण कशाप्रकारे करतो, हे महत्त्वाचे असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अभिनेते प्रसाद ओक यांनी त्यांची मुलाखत घेतली. गाडगीळ यांनी सांगितले की, कोणताही…

Read More

पीएमपीएमएलची ‘वर्षा सहल’ पर्यटन बस सेवा सुरू:महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते स्वारगेट येथे उद्घाटन

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवा सुरू केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते स्वारगेट बसस्थानक येथे या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर उपस्थित होते. नागरिकांना पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद सुरक्षित आणि किफायतशीर पद्धतीने घेता यावा, या उद्देशाने ही बस सेवा…

Read More

65 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक:आळंदी पोलिसांनी ऑनलाइन फसवणूक टोळीतील आरोपीला केली अटक

देशातील विविध राज्यांतील तब्बल ६५ नागरिकांना इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि इतर ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. सचिन संजय काळे (वय २५, रा. गोडाऊन चौकाजवळ, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आळंदी पोलिसांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान आरोपी सचिन…

Read More

ED, CBI सगळं तुमच्याकडे तरी 30 वर्षांच्या तरुणाची धास्ती का?:शिरसाटांच्या भेटीवरून अभिजीत दिपकेंचा भाजपला टोला, दिल्लीतील तक्रारीवरही दिपकेंचे भाष्य

सीजेपी पक्षाचे संस्थापक आणि विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेले अभिजीत दिपके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सविस्तर भाष्य केले आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच, भाजपने एका ३० वर्षांच्या मुलाची एवढी भीती बाळगण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे….

Read More

पुणे शहरात तडीपार केलेले तीन गुंड पुन्हा पकडले:मंडई, येरवडा अन् कात्रज परिसरात पोलिसांची कारवाई

पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या तीन गुंडांना पोलिसांनी पुन्हा शहरात आल्याने अटक केली आहे. मंडईतील वाहनतळ, येरवडा आणि कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महात्मा फुले मंडई परिसरातून साहिल रफीक कलादगी (वय 24, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला पोलिसांनी पकडले. सहायक पोलिस फौजदार…

Read More

पुणेकरांच्या खिशाला कात्री:रिक्षाच्या किमान भाड्यात 5 रुपयांची वाढ, 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू; किमान भाडे 30 रुपये

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढ मंजूर करण्यात आली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीओ) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, 1 सप्टेंबरपासून प्रवाशांना अधिक भाडे मोजावे लागणार आहे. पहिल्या दीड किलोमीटरसाठीचे किमान भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये, तर त्यानंतर प्रति किलोमीटर दर 17 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

Read More

तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचे खडेबोल:100% नियमपालन झालं, तरी परवाना का रोखला? आता नुकसानभरपाई द्या!

राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षेसाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एफडीएला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. नवी मुंबईतील एका बार-रेस्टॉरंटचा परवाना निलंबित केल्यानंतर पुनर्तपासणीत 100 टक्के नियमांचे पालन झाल्याचे स्पष्ट असूनही निलंबन मागे न घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने एफडीएच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर जवळपास 15…

Read More

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ?:मनी लाँड्रिंग प्रकरणात खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग आणि कथित 100 कोटी वसुली प्रकरणाशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली असून, या घडामोडींवर अनिल देशमुख यांनीही गंभीर आरोप करत सरकारला घेरले आहे. राज्यपालांची ईडीला मंजुरी बार आणि रेस्टॉरंटमधून कथित खंडणी वसुलीशी संबंधित मनी लाँड्रिंग (PMLA) प्रकरणात अनिल देशमुख…

Read More