हेल्मेटवर बनावट ‘आयएसआय' मार्क लावून होतेय फसवणूक
जिल्हाभरात वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी सुरू असल्याने नागरिक घाईघाईत रस्त्यावरील विक्रेत्यांकडून हेल्मेट खरेदी करत आहेत. मात्र, या संधीचा फायदा घेत निकृष्ट दर्जाची हेल्मेट विक्रीसाठी आली आहेत. अनेक बनावट हेल्मेटवर ‘आयएसआय’ चिन्हासारखे दिसणारे स्टिकर लावून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.केवळ ‘आयएसआय’ मार्क दिसल्याने हेल्मेट दर्जेदार ठरत नाही. अपघाताच्या वेळी अशी निकृष्ट हेल्मेट्स दुचाकीचालकाच्या डोक्याचे…