Headlines

'अपयशाची भीती बाळगू नका':सिद्धार्थ जाधवचा तरुणाईला मंत्र, चिंचवडमधील ‘दिलखुलास गप्पा’ कार्यक्रमात सकारात्मकतेचा संदेश

सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने तरुणाईला जीवनात अपयशाची भीती न बाळगता सकारात्मक विचारांनी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला. कोणतीही कृती पूर्ण क्षमतेने आणि समर्पण भावनेने केल्यास यश निश्चित मिळते, असे त्याने सांगितले. चिंचवड येथे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि दिशा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिद्धार्थ जाधवशी दिलखुलास गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे…

Read More

Karuna Munde Attacks Pankaja and Dhananjay Munde Over Political Exit Statements | Beed Politics | BJP

बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या ‘राजकीय निवृत्ती’ आणि ‘एक्झिट’ या शब्दांची जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी अलिकडेच राजकारणातील गलिच्छपणा आणि वैतागातून निवृत्तीबाबत सूचक वक्तव्ये केली होती. यावर आता करुणा शर्मा य . मुंडे बहीण-भावाच्या वक्तव्याचा समाचार घेताना करुणा शर्मा यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. “तुम्ही दोघांनीच आतापर्यंत गलिच्छ राजकारण…

Read More

डॉ. शिवाजीराव कदम महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष:डॉ. कुमार सप्तर्षींच्या निधनानंतर एकमताने निवड

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पुण्यातील गांधी भवन येथे झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते; डॉ. सप्तर्षी सुमारे २० वर्षे संस्थेचे अध्यक्ष होते. या बैठकीत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि….

Read More

'मातोश्री'वरील बैठकीत नेत्यांमध्ये खडाजंगी:एक तरुण थेट मोदींना भिडतोय अन् तुम्ही पदांसाठी भांडताय?; उद्धव ठाकरेंनी झापले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ‘मातोश्री’ निवासस्थानी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि नवीन नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीत ठाणे आणि कल्याणमधील दोन गटांतील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला. स्वतःच्या डोळ्यांसमोर पदाधिकाऱ्यांची ही गटबाजी…

Read More

उपजिल्हाधिकारी 'सामान्य' पद रद्द:राज्यभरात आता फक्त 'उपजिल्हाधिकारी महसूल' हेच पद राहणार

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने जिल्हास्तरावरील प्रशासकीय पदनामांमधील गोंधळ दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, ‘उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)’ हे पद रद्द करण्यात आले असून, आता राज्यभरात केवळ ‘उपजिल्हाधिकारी (महसूल)’ हेच पद अस्तित्वात राहणार आहे. या बदलामुळे प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘उपजिल्हाधिकारी (महसूल)’ आणि ‘उपजिल्हाधिकारी…

Read More

धनंजय मुंडेंच्या विधानावर मनोज जरांगेंची टीका:म्हणाले- उशीरा शहाणपण आलं, आता मराठ्यांच्या नादी लागू नका अन् गुन्हेगारांची साथ सोडा

बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपले सर्वच क्षेत्रांतील वजन कमी झाले होते, अशी कबुली देत अप्रत्यक्षपणे पश्चात्ताप व्यक्त केला. त्यांच्या याच विधानाचा धागा पकडत आज मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे….

Read More

माजी पोलीस अधिकाऱ्याकडून सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचा आरोप:पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये पार्किंगवरून वाद, सीसीटीव्ही फुटेज समोर

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या प्रवेशद्वारावर पार्किंगच्या कारणावरून माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे आणि सुरक्षारक्षक यांच्यात झालेल्या वादाचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यामध्ये सुरक्षारक्षकाला मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात स्वतः निवृत्त पोलीस अधिकारी यांनीच पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्याने नेमके काय…

Read More

TV वर बंद, पण यूट्यूबवर सुपरहिट!:डॉ. अमोल कोल्हेंची 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका आता आठवड्याचे 6 दिवस

टीआरपीच्या वाढत्या स्पर्धेमुळे वाहिन्यांनी नव्या मालिकांचा धडाका लावला असून, याचा फटका डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेला बसला. वाहिनीने अवघ्या पाच महिन्यांत आणि 152 भागांतच या मालिकेला अचानक निरोप दिला. मात्र, मालिका अशा प्रकारे बंद झाल्यानंतर यातील मुख्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ती…

Read More

'रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल!:गिरीश महाजन म्हणाले- "राज्यातला माणूस PM झाला तर वाईट काय?; भुजबळांशी 'दुराव्या'वरही दिले स्पष्टीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी ‘माझा पुतण्या आज ना उद्या देशाचा पंतप्रधान होईल’ असे वक्तव्य केले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना, आता राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी याला दुजोरा देणारे सूचक विधान केले आहे. “आमचा मराठी माणूस, आमच्या राज्यातला माणूस पंतप्रधान झाला तर त्यात वाईट काय आहे? देवेंद्रजींचे वय अजून कमी आहे,…

Read More

नागपुरात नितीन गडकरींच्या घरावर युवक काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा:बॅरिकेडिंगवर चढत घोषणाबाजी, अनेक कार्यकर्ते ताब्यात

केंद्र सरकारच्या ई-20 या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणासह वाढती महागाई, बेरोजगारी आणि नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर युवक काँग्रेसने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली असून, पोलिसांनी बॅरिकेडिंग करून हा मोर्चा मध्येच रोखला व…

Read More