Headlines

सर्व विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करत स्वत: मध्ये सुधारणा करण्याची गरज:तहसीलदार महेश सावंत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; नवागतांचे केले स्वागत‎

अहिल्यानगरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांची उभारणी होत असल्याने येणारा काळ नवोदित अभियंत्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत आशादायी ठरणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना अपयशासाठी इतरांना जबाबदार न धरता आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन तहसीलदार महेश सावंत यांनी केले. संजीवनी पॉलीटेक्नकच्या प्रथम व थेट द्वीतिय वर्षाच्या नवागतांचे स्वागत ‘संजीवनी तंत्रआरंभ’ या…

Read More

खासगी रुग्णालयातील 260 वर शस्त्रक्रिया लांबणीवर:2400 डॉक्टर संपात सहभागी, हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांच्या झाल्या शस्त्रक्रिया, ओपीडी दिवसभर राहिली बंद‎

राज्य सरकारने बीएचएमएस आणि सीसीएमपी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवरील नाव नोंदणी करण्याच्या निर्णयाविरोधात खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी पुकारलेला संप मंगळवारसह बुधवारीही सुरूच होता. या संपामुळे अहिल्यानगर शहर व . दरम्यान, गुरुवारपासून खासगी डॉक्टरांकडून तातडीच्या सेवादेखील पूर्णपणे बंद ठेवल्या जाण्याचा इशारा देण्यात आला. यामुळे वैद्यकीय उपचारांसह शस्त्रक्रियांसाठी येणाऱ्या रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागणार…

Read More

रक्तरंजित थरारामुळे विक्रोळी हादरली!:गाण्याच्या मोठ्या आवाजामुळे 2 भावांनी काढला तिसऱ्याचा काटा,14 वर्षांच्या पुतण्यालाही सोडले नाही

मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट परिसरातून एका अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटनेची माहिती समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात दोन सख्ख्या भावांनी आपल्याच एका भावाच्या संपूर्ण कुटुंबावर धारदार शस्त्रांनी निर्घृण हल्ला केला. या भयानक हल्ल्यात एका भावाचा आणि त्याच्या १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची पत्नी आणि लहान मुलगा मृत्यूशी झुंज…

Read More

बेईमानी करणाऱ्यांना कायद्यानेच संपवू:संजय राऊतांचा शिंदेंना इशारा, भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांना पर्याय नसल्याचा दावा

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. “ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात अतिशय धारदार युक्तिवाद केल्याने शिंदे गटात चलबिचल सुरू झाली आहे. आता त्यांच्यासमोर स्वतःचा गट भाजपमध्ये किंवा प्रहारसारख्या छोट्या पक्षात विलीन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही,” असे…

Read More

कालवा आवर्तनामुळे सव्वा लाख हेक्टरला लाभ:पुराचे वाहून जाणारे पाणी कालव्यातून सोडल्याने नियंत्रण, पाऊस नसल्याने पिके, खरिपाला हाेती गरज‎

उजनी धरणातून पूर नियंत्रणासाठी नदीपात्रातून व डाव्या कालव्यातून सोडलेले आवर्तन लाभ क्षेत्रातील पिकांसाठी नि शेतक-यांसाठी फायदेशीर ठरत आहे. भीमा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची एकूण लांबी सुमारे १३८ किलोमीटर आहे. या कालव्यामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १ ते १.२५ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. जिल्ह्यात सर्वाधिक सिंचनाचा लाभ माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळतो. सुमारे ४५ ते…

Read More

हिंगोलीत शतपावली करणाऱ्या महिलेचे गंठण पळवले अन् पुढे…:भरधाव चोरट्यांचा अपघात, पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयातच ठोकल्या बेड्या

कळमनुरी येथे महिलेच्या गळ्यातील दागिने पळविल्याची घटना घडली, मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या चोरट्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने चोरटे पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 5 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या दोघांवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी शहरातील मारवाडी गल्लीभागातील संतोषी सारडा ह्या बुधवारी…

Read More

Sunetra Pawar Directs MHADA Officials to Expedite Housing Projects

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यां . बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हाडाच्या स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. शासन स्तरावरील प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेला गती देऊन…

Read More

खामगाव, नांदुराच्या नागरिकांची तहान भागवणाऱ्या ज्ञानगंगात 94 टक्के साठा:तीन लघु प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, 29 ते 31 या तीन दिवसांत पाऊस‎

खामगाव पाटबंधारे उपविभाग खामगाव अंतर्गत येणाऱ्या खामगाव व जळगाव जामोद तालुक्यातील सात प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पातील पाण्याच्या पातळीने शंभरी गाठली आहे. तर दोन प्रकल्प शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या दोन प्रकल्प क्षेत्रात आगामी दिवसात जोरदार . तीन प्रकल्पांतून विसर्ग यंदाच्या पावसाळ्यात जून व जुलै या २ महिन्याच्या कालावधीत झालेल्या पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा, गोडाडा…

Read More

मराठी शाळांतील पाण्याच्या प्रश्नावर मनसेचे आंदोलन:महापालिका आयुक्तांचे महिन्यात सुविधा देण्याचे आश्वासन‎

महापालिकेच्या मराठी शाळांमधील पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसह विविध मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. मनसेने १० एप्रिल २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन मराठी शाळा बंद पडू नयेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी व स्वच्छतेची व्यवस्था करण्याची मागणी केली होती….

Read More

शिवरस्त्यातील अडथळा दूर; वयोवृद्ध शेतकऱ्याच्या उपोषणाला मिळाले यश, प्रशासन नमले, शिवरस्ता खुला करून मजबुतीकरणाच्या कामाला सुरुवात‎

शिवरस्ता तातडीने खुला करून देण्याची मागणीसाठी राळेगणसिद्धी येथील शेतकरी भाऊ भागचंद गाजरे यांनी पारनेर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू केलेले उपोषण बुधवारी (५ ऑगस्ट) मागे घेतले. गाजरे यांच्या एकाकी लढ्याला पाचव्या दिवशी यश आले. शासनाच्या मात . दरम्यान, गाजरे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी (२ ऑगस्ट) नायब तहसीलदार कारखिले यांनी गाजरे यांची भेट घेऊन सदर…

Read More