फुलांचे दर वधारले; मोगरा ८०० रुपये किलो:लग्नसराईमुळे दरात तिप्पट वाढ; वाढत्या उन्हाचाही बसतोय फटका
प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यात सध्या फुलांचे दर वधारले असून, लग्नसराई, सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. विशेषतः गुलाब आणि मोगरा या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने त्यांच्या किमतींमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. लग्नसराई आणि उन्हाळा लागण्यापूर्वी २०० ते ३०० रुपये किलो दर असलेल्या मोगरा ८०० रुपये तर १५० ते २०० रुपये किलो…