Headlines

आळंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उपसभापती अश्विनी सोनवणे यांची भेट:सभापतींनी रुग्णांच्या समस्या जाणून घेत दिल्या महत्त्वाच्या सूचना‎

ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी आणि आरोग्य केंद्रातील अडीअडचणी दूर व्हाव्यात या उद्देशाने फुलंब्री पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी आजिनाथ सोनवणे यांनी सोमवारी (१५ जून) आळंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या . या भेटीदरम्यान उपसभापतींनी विशेषतः महिलांचे आरोग्य आणि गरोदर मातांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांवर भर दिला. ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःच्या…

Read More

इंद्रायणी नदीत उडी घेतलेल्या विवाहितेचे वाचले प्राण:देहू येथे पीएमआरडीएच्या ‘पीडीआरएफ’ पथकाने वाचवले, उपचार सुरू

देहू येथील भैरवनाथ चौक पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विवाहितेचे प्राण वाचवण्यात पुणे महानगर प्रदेश आपत्कालीन प्रतिसाद दल (पीडीआरएफ) आणि पोलिसांना यश आले. ही घटना सोमवारी (दि. १५) सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. पुष्पा सुरेश गाडे (रा. चव्हाणनगर, देहूगाव) असे या विवाहितेचे नाव आहे. त्यांच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात…

Read More

जयपूरमध्ये अभिजीत दीपके यांना मारहाण:सुषमा अंधारे व विश्वंभर चौधरींकडून घटनेचा तीव्र निषेध, प्रशासनाने सुरक्षा पुरवायला हवी- अंधारे

नीट पेपरफुटी, ढासळलेली शिक्षण व्यवस्था आणि बेरोजगारी यांसारख्या तरुणांच्या प्रश्नांवर जयपूर येथील ‘शहीद स्मारका’वर आयोजित मोठ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना दोन तरुणांनी थप्पड मारल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या सीजेपीच्या समर्थकांनी त्या दोन्ही तरुणांना पकडून मारहाण केली. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. या…

Read More

जयपूर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडक बंदोबस्त:'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनासाठी पोलीस सतर्क

नीट पेपरफुटीविरोधात जयपूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर जयपूरमध्ये हल्ला झाला होता. या घटनेनंतर नागपुरात १६ जून रोजी होणाऱ्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. सोमवारी जयपूरमधील शहीद स्मारकावर आंदोलन सुरू असताना गर्दीतील काही तरुणांनी अभिजित दिपके यांच्यावर…

Read More

अमरावतीत जागतिक रक्तदाता दिनी गौरव सोहळा:25 वेळा रक्तदान करणाऱ्यांसह सामाजिक संस्थांचा सन्मान

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २५ हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या व्यक्तींसह विविध सामाजिक संस्थांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून रक्तपेढीचे विभाग प्रमुख डॉ. आशिष वाघमारे, रक्त…

Read More

पार्वती नगरातील जलकुंभाची पाईपलाईन फुटली:6 हजार कुटुंबांना पाणीटंचाई; वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर प्रभावित

अमरावती शहरातील दाट लोकवस्तीच्या पार्वतीनगर परिसरातील जलकुंभातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने सोमवारी पाणीपुरवठा खंडित झाला. यामुळे सुमारे ६ हजार कुटुंबांमधील २५ हजार नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या बिघाडामुळे पार्वतीनगर, वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर आणि गडगडेश्वरच्या काही भागातील नागरिकांना दिवसभर पाण्याविना राहावे लागले. अनेकांनी साठवलेल्या पाण्याचा वापर केला, तर काहींनी पर्यायी व्यवस्था केली….

Read More

पीएम किसानचा 23 वा हप्ता:2.79 लाख शेतकऱ्यांसाठी 30 जूनपर्यंत KYC बंधनकारक

अमरावती जिल्ह्यातील २ लाख ७९ हजार ५८ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या २३ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, हा हप्ता मिळवण्यासाठी त्यांना ३० जूनपर्यंत ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत केवायसी न झाल्यास या शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता रखडण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना…

Read More

अमरावतीत रोजगार, उद्योग सर्वेक्षणाचा शुभारंभ:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते 'मित्रा' व शासनाचा पुढाकार

अमरावतीसह पश्चिम विदर्भात रोजगार आणि उद्योग विकासासाठी दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांचा शुभारंभ करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते आज, सोमवारी या सर्वेक्षणांना सुरुवात झाली. केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, ‘मित्रा’ आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ही सर्वेक्षणे हाती घेण्यात आली आहेत. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत ‘नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण’ (पीएसएफएस) आणि…

Read More

सीजेपी राबवित आहे राहुल गांधींचाच अजेंडा:खा. डॉ. कल्याण काळे: डोणगावकर, ॲड. अक्रम यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सोमवारी (दि. १५) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, क्रॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. हा अजेंडा घेऊन ते उतरले असले तरी, आमचे नेते खासदार राहुल गांधी यांनी ही मागणी आधीच केली होती. एनएसयूआय, युवक काँग्रेस आणि इतर पक्षांनीही हा मुद्दा उचलून धरला…

Read More

नैसर्गिक शेती, पाणी संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे:दीपा मुधोळ-मुंडे यांनी 'आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती' पुस्तकाच्या प्रकाशनावेळी केले आवाहन

पुण्यात वनराई संस्थेच्या वतीने ‘आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. नैसर्गिक शेती, विषमुक्त अन्ननिर्मिती आणि जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या पुस्तकाचे लेखक प्रमोद जाधव आहेत. प्रमोद जाधव हे नैसर्गिक शेतीचे अभ्यासक, प्रयोगशील शेतकरी आणि समाजकल्याण विभागाचे सह आयुक्त आहेत. या प्रकाशन सोहळ्याला वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, समाजकल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, कृषी प्रक्रिया…

Read More