Headlines

नागपुरात विवाहितेवर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव!:गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील व्हिडीओ, दोन आरोपींना अटक

नागपूरमध्ये एका विवाहित महिलेवर बलात्कार, ब्लॅकमेल करणे आणि धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याचे एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एका मौलवीचा शोध सुरू आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे या वादाला आणखीच हवा मिळाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख कळमेश्वरचे रहिवासी अय्याज…

Read More

शिवसेना ठाकरे गटात फुटीची चर्चा:आदित्य ठाकरे म्हणाले- अफवांवर विश्वास ठेऊ नका, आमचे खासदार आमच्या सोबतच

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली. बैठकीनंतर सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. मात्र, काही खासदार नव्या गटाच्या स्थापनेच्या तयारीत असल्याची…

Read More

येरवडा येथे तरुणावर शस्त्राने हल्ला:आरडाओरडा करणाऱ्या टोळक्याला जाब विचारल्याने घडली घटना

येरवडा परिसरात आरडाओरडा करणाऱ्या टोळक्याला जाब विचारल्याने एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात दहशत माजली होती. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. ही घटना १२ जून रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास येरवड्यातील पंचशीलनगर परिसरात घडली. जखमी तरुणाचे नाव उमेश मंगलदास गायकवाड (वय ३२,…

Read More

19 दिवस सरकारची अग्निपरीक्षा:पावसाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? जाणून घ्या, राजकीय रणांगणात कोणती शस्त्रे विरोधकांच्या हाती

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून मुंबईत सुरू होत असून १० जुलैपर्यंत चालणार आहे. मात्र यंदाचे अधिवेशन केवळ विधिमंडळीन कामकाजापुरते मर्यादित राहणार नसून ते सरकार आणि विरोधकांमधील मोठ्या राजकीय संघर्षाचे केंद्र ठरण्याची चिन्हे आहेत. राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती, शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी, कर्जमाफीवरील प्रश्नचिन्ह, मराठा-ओबीसी आरक्षणाचा संघर्ष, वाढती गुन्हेगारी, महिला सुरक्षेचे मुद्दे आणि…

Read More

विधान परिषदेवरून महायुतीत धुसफूस वाढली:शंभूराज देसाईंचा थेट इशारा- "आता आलेल्या परिस्थितीला भाजपलाच सामोरे जावे लागेल"

सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतरही शिवसेनेचा पाठिंबा अद्याप स्पष्ट झालेला नसताना राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. “नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवेळी आम्ही समन्वयाचा प्रयत्न केला, पण भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला भाजपलाच…

Read More

संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको:खासदार कल्याण काळे पोलिसांच्या ताब्यात, ‘पुन्हा आंदोलन करू’चा इशारा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी संभाजीनगर-जालना महामार्गावरील केंब्रिज चौकात जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. काँग्रेसच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून तब्बल ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलक खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक…

Read More

धरणांतील पाणी शेतीसाठी बंद!:उपलब्ध पाणी प्रामुख्याने पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटलांचे आदेश, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत धरणांमधील उपलब्ध पाणी प्रामुख्याने पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून अनेक भागांमध्ये शेतीसाठीचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

Read More

हिंगोलीत धक्कादायक घटना:औंढा नागनाथमध्ये तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथे तरुणीने घरात कोणीही नसताना गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रविवारी ता. १४ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनवाडी येथील आरती शांतीराम घनसावंत (१७) हि तरुणी तिच्या कुटुंबियांसह राहते. घरी आई, वडील शेतात काम करीत असून आरती शिक्षण घेत…

Read More

कारखाना कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

राहुरी| डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब तारडे यांनी राहत्या घरासमोर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपासून साखर कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार नसल्याने त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. अशाच परिस्थितीत तारडे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची माहिती मिळाली. मृत बाळासाहेब तारडे…

Read More

मनपा प्रसूतिगृहांतील बाळंतीणींना 3 महिन्यांपासून मोफत अन्न नाही:औषधे, सलाईनची वानवा; नातेवाइक बाहेर विकत घेतात

सोलापूर शहरातील महापालिकेच्या ७ प्रसूतिगृहांमधील २८३ बाळंतीण गेल्या अडीच महिन्यांपासून मोफत अन्नापासून वंचित आहेत. इतकेच नव्हे, औषधे आणि सलाइनचीदेखील वानवा आहे. नातेवाइक बाहेरच्या मेडिकलमधून खरेदी करताना दिसून येतात. प्रसूतीसाठी दाखल होऊन डिस्चार्ज मिळेपर्यंत मातांना सकस आहार देण्याची योजना मनपा अधिकाऱ्यांनी गुंडाळून ठेवल्यासारखी स्थिती आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याचे कारण हास्यस्पद दिले. काढलेल्या निविदेला प्रतिसाद नसल्याने…

Read More