Headlines

74 जळगाव येथे‎ दहावी, बारावीतील‎ गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात‎:अशा उपक्रमांमुळे शिक्षणाविषयी प्रेरणा निर्माण होते – शिवराज भुमरे

पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथे बाबासाहेब एरंडे यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा नुकताच जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांच्या हस्ते पार पडला झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राम एरंडे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी बाबासाहेब एरंडे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी ७४ जळगाव, खामजळगाव व…

Read More

सारोळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे‎ मिरचीचे पीक काढण्याची वेळ‎:केलेला खर्चही पदरी पडेना, शासनाने पंचनामे करण्याची होतेय मागणी

निसर्गाची अवकृपा, बदलणारे हवामान आणि तीव्र पाणीटंचाईमुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्याचा ठरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथील शेतकरी अशोक संपत वराडे यांनी पिकावरील वाढती रोगराई आणि पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे आपली एक एकर क्षेत्रातील शिमला मिरचीचे पीक स्वतःच्या हाताने उपटून टाकले आहे. यामुळे या शेतकऱ्याचे आर्थिक संकट गडद झाले आहे….

Read More

भाविकाने शिवाई संस्थानला 15 गुंठे जमीन केली दान:शिवना येथील ग्रामस्थांकडून कैलाश काळे यांचा सत्कार

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथिल ग्रामदैवत श्री. शिवाई देवी मंदिरालगतची १५ गुंठे जमीन शिवना येथील भूमिपुत्र तथा डोंबिवली येथिल व्यावसायिक कैलाश श्रीरंग काळे यांनी संस्थानला दान केली. त्यानिमित्त काळे यांचा संस्थान व समस्त ग्रामस्थांच्या वतीने रविवारी सत्कार करण्यात आला. शिवना गावाच्या पश्चिमेला ग्रामदैवत श्री. शिवाई देवीचे पुरातन मंदिर आहे. मंदिराला नुकताच शासनाकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा…

Read More

राष्ट्रवादीचा अर्थ खाते परत मिळवण्यासाठी प्रचंड दबाव:मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले – सध्यातरी अर्थ खाते हे माझ्याकडेच

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या “वित्त आणि नियोजन’(अर्थ खाते) स्वतःकडेच राखण्यासाठी भाजप आणि ते पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) पडद्यामागे तीव्र संघर्ष सुरू आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या तिजोरीच्या चाव्या सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. आगामी २२ जून २०२६ च्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मूळ सत्तावाटपाचा हवाला देत राष्ट्रवादीने हे…

Read More

वेरूळ येथील शिक्षक मृत्यू प्रकरण:पोलिसांनी लाथा मारल्याने हृदयविकाराचा ‎झटका येऊन शिक्षक बोरसे यांचा मृत्यू – चंद्रकांत खैरे

पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली शिक्षक‎ सुरेश बोरसे यांच्या छातीवर लाथा‎ मारल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका‎ आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.‎ पोलिसांनी आरोपींवर खुनाचे ३०२ कलम‎का लावले नाही? याची मी वरिष्ठ‎ पातळीवर चौकशी करणार आहे. तसेच‎ आरोपींना तात्काळ जामीन मिळण्यामागे‎ मोठी लिंक असून, राजकीय दबावाची‎ चौकशी करण्यास भाग पाडू, असे माजी‎ खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.‎ ‘मस्साजोग येथील…

Read More

पत्नीसोबत जगभ्रमंतीचे स्वप्न अपूर्ण राहिले:निवृत्त बँक कर्मचाऱ्याकडून सैन्याला 25.51 लाख रुपये, मुलांची मिळाली खंबीर साथ

अनेकांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य हे आराम करण्याचे किंवा फिरायला जाण्याचे माध्यम असते. परंतु नागपूरचे ७० वर्षीय निवृत्त बँक कर्मचारी श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी सेवानिवृत्तीच्या पैशांतून देशप्रेमाचा आदर्श ठेवला. श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी आयुष्याची संपूर्ण पुंजी म्हणजेच २५ लाख ५१ हजार रुपये “आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंड’साठी दान केली. त्यांनी उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर…

Read More

सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या:'ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी'प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले

‘ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’ या म्हणीप्रमाणे भाजप आणि मोदी सरकार देशाचा कारभार हाकत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला. ईव्हीएममधील गडबडीचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचताच, भाजपने ईव्हीएम मशीन्सच जाळून…

Read More

मोर्शी कॉलनी परिसरात पाणी टंचाई, गढूळ पाण्याचा पुरवठा:नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन, 5 दिवसांत शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

मोर्शी शहरातील कॉलनी परिसरात नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना अनियमित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसह स्थानिकांनी नगराध्यक्षा प्रतीक्षाताई गुल्हाने यांना निवेदन दिले. येत्या पाच दिवसांत शुद्ध व मुबलक पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्शी शहरात जुन्या आणि नवीन…

Read More

अधिकाऱ्यांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित:सीईओ सत्यम गांधींनी घेतला विकास योजनांचा आढावा

अमरावती जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचे उत्तरदायित्व संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी शनिवारी, सुटीच्या दिवशी विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित कामांचा निपटारा आणि नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत वेळेत…

Read More

मानवाधिकार असोसिएशनची आयुक्तांकडे तक्रार, नगरपालिका प्रशासनावर चालढकलचा आरोप:अचलपूर नगर परिषदेतील अनियमिततेवर कारवाईची मागणी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशनने अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका प्रशासनावर कामकाजात चालढकल केल्याचा आरोप करत तक्रार केली आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून, न.प. प्रशासन विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अचलपूर येथील किशोर केशवराव मोहोड यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई येथे तक्रार केली होती….

Read More