बोरीवली स्थानकाचा पुनर्विकास करा अन् थेट 'बोरीवली-कल्याण' लोकल सुरू करा:आमदार संजय उपाध्याय यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
मुंबईतील बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय उपाध्याय यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, बोरीवली स्थानक हे मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून, येथे दररोज सुमारे 4.5 लाख प्रवासी ये-जा करतात. पंतप्रधान अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाच्या आधुनिकीकरण व पुनर्बांधणीला…