Headlines

पशुपालकांसाठी मोठी बातमी!:राज्यात 'पशुधन विमा योजना' लागू; जनावरांच्या मृत्यूवर मिळणार 80 हजारांपर्यंत मदत

राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय पशुधन अभियाना’अंतर्गत राज्यामध्ये ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यास राज्य शासनाने नुकतीच प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पशुपालकांना आता मोठा आधार मिळणार असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या दृष्टीने शासनाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या योजनेबाबत सविस्तर माहिती…

Read More

जालन्यात दीड लाखांची लाच स्वीकारताना प्राचार्यांना अटक:समाजकार्य महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार, 'एसीबी'ची धडक कारवाई

जालना शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, अधीक्षक, लिपीक, शिपाई आणि ग्रंथपाल यांना तब्बल दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. एका सेवानिवृत्त प्रबंधकाला त्यांच्या कालबद्ध पदोन्नतीचा लाभ आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळवून देण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम स्वीकारताना एसीबीने या पाचही…

Read More

400 हॉस्पिटल बेमुदत बंद, 20 हजार रुग्णांची गैरसोय:आयएमएचा होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी परवानगीला विरोध

सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मकोलॉजी (सीसीएमपी) परीक्षा उत्तीर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) गुरुवारी रस्त्यावर उतरली. या आंदोलनामुळे अमरावतीतील ४०० हून अधिक रुग्णालये बेमुदत बंद ठेवण्यात आली, ज्यामुळे सुमारे २० हजार रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळू शकली नाही. आयएमएच्या सदस्यांनी सकाळी ११.३० वाजता इर्विन चौकातील डॉ….

Read More

विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेची नवीन कार्यकारिणी:डॉ. श्यामसुंदर निकम अध्यक्षपदी, इतर पदाधिकाऱ्यांची निवड

विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. तपोवनातील संत अच्युत महाराज खुले सभागृहात पार पडलेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक आणि लेखक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. वि.सा. संघाचे केंद्रीय शाखा समन्वयक विवेक कवठेकर यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी निवडण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष…

Read More

रायपुर आश्रम शाळेत माध्यमिकला एकही शिक्षक नाही:24 पैकी 14 पदे रिक्त, आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर

चिखलदरा तालुक्यातील रायपुर येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेत माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शाळेतील एकूण २४ मंजूर पदांपैकी तब्बल १४ पदे रिक्त आहेत, ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. ‘खोज’ संस्थेचे ॲड. बंड्या साने यांनी या गंभीर शैक्षणिक अनुशेषाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी आदिवासी विकास विभागाचे अपर…

Read More

'शिवसेना कोणाची? जनतेनेच निकाल दिला':विरोधकांवर एकनाथ शिंदे यांचा घणाघात, विरोधकांची 'जुनी कॅसेट' सुरू असल्याचा टोला

शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून हल्ला चढवत, “शिवसेना कोणाची याचा निकाल महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दिला आहे. आम्ही 40 आमदारांसह बाहेर पडलो आणि जनतेने आम्हाला 60 आमदारांपर्यंत पोहोचवून आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले,” असे ठाम शब्दांत सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले, “जनतेच्या न्यायालयात आमचा विजय आधीच झाला आहे. त्यामुळे…

Read More

काइनेटिक समूहाकडून ऐतिहासिक कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन:कंपनीच्या 5 दशकांचा प्रवास 'काइनेटिक एनर्जी'मधून उलगडला

काइनेटिक समूहाच्या ‘काइनेटिक एनर्जी – इंडियाज ओरिजिनल पीपल मूव्हर्स’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. कंपनीचे संस्थापक अरुण फिरोदिया, अध्यक्ष अजिंक्य फिरोदिया आणि ज्येष्ठ वाहन उद्योग इतिहासकार आदिल जल दरुखानावाला यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. हे पुस्तक काइनेटिक समूहाच्या पाच दशकांहून अधिक काळाच्या प्रवासाचा वेध घेते. काइनेटिकने भारताच्या गतिशीलता क्षेत्रात मोठे योगदान…

Read More

केवळ आमदारांच्या बहुमतावर पक्ष बहाल करणे चुकीचे:सत्य ठाकरेंसोबतच राहील, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर असीम सरोदेंची प्रतिक्रिया

शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली, ज्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयातील या घडामोडींवर आणि ठाकरे गटाच्या युक्तिवादावर आता प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. असीम सरोदे म्हणाले, धनुष्यबाण…

Read More

जिल्हाधिकारी डुडींचे चाकण एमआयडीसी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश:राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व पीएमआरडीएच्या रस्त्यांचा समावेश

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसीच्या अखत्यारीतील रस्त्यांचा समावेश आहे. मुदतीनंतर रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल आणि खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी…

Read More

'कपिल सिब्बल म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही!':नरेश म्हस्केंचा शिवसेना ठाकरे गटावर टोला, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर केले भाष्य

कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे वकील असल्याने ते त्यांचीच बाजू मांडणार, ते काही ब्रह्मवाक्य नाही, असा टोला शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर प्रतिक्रिया देताना, कायदेशीर निर्णयापेक्षा एकनाथ शिंदे यांनी प्रचंड जनाधाराच्या जोरावर ‘लोकांच्या कोर्टात’ आपले नेतृत्व आधीच सिद्ध केले आहे, असा ठाम विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला. माध्यमांशी…

Read More