Headlines

महात्मा गांधी जयंती:सटाण्यामध्ये विद्यार्थ्यांनी सेवासंकल्प अभियानातून दिला स्वच्छतेचा संदेश

नगरपरिषदेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व स्वच्छताविषयक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. यावेळी शहरात ६०० वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच बुद्ध विहार ते रेल्वे तलाव परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा सहआयुक्त शाम गोसावी,…

Read More

क्राइम:गणपती मंदिर परिसरात मंगळसूत्रे केली लंपास

एन-१ सिडको येथील काळा गणपती मंदिर परिसरात चतुर्थीनिमित्त झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे लंपास केल्याची घटना उघडकीस आली. सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत दीड तासाच्या अंतराने घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ७७ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले. एन-६ संभाजी कॉलनीतील रहिवासी गीता बनसोड या दर्शनानंतर मंदिराबाहेरील कटलरीच्या दुकानात गेल्या…

Read More

बससेवा अखेर सुरू:35 वर्षांनंतर दावरवाडीतून संभाजीनगरसाठी बससेवा

३५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पैठण तालुक्यातील दावरवाडी गावातून छत्रपती संभाजीनगरसाठी थेट एसटी बससेवा अखेर सुरू झाली आहे. १९९० मध्ये बंद पडलेली बससेवा पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांची अनेक वर्षांची मोठी गैरसोय दूर झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. पैठणकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोर तांगडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने एसटी प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना…

Read More

दुष्काळ पाहणी दौरा:दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार : मंत्री बावनकुळे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील सोयाबीन व कपाशीची पिके पाण्याअभावी पूर्णपणे करपून गेली आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी थेट त्यांच्या बँक खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि….

Read More

आमठाण्यात दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात:त्रिस्तरीय समिती बांधावर

आमठाणा व परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्या त्रिस्तरीय समितीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली जात आहे. सध्या तलाठी विशाल पाटील व ग्रामविकास अधिकारी बंसिधर पडूळकर यांच्यासह समितीतील संबंधित अधिकारी शेतावर जाऊन दुष्काळामुळे पिकांवर…

Read More

कौतुक:सुलतानाबादेत प्लास्टिक व कचऱ्याची होळी करून विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश‌

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुलतानाबाद येथील विद्यार्थ्यांनी गाव परिसरात स्वच्छता अभियान राबवत प्लास्टिक व कचरा गोळा केला. जमा केलेल्या कचऱ्याची होळी करून विद्यार्थ्यांनी ‘गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच’ असल्याचा संदेश ग्रामस्थांना दिला. या वेळी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक कारभारी गायके, सरपंच अनिता कारभारी गायके, उपसरपंच सोन्याबापू गायके, ग्रामपंचायत अधिकारी…

Read More

पुरवठा विभागाची धावपळ:सोयगाव तालुक्यात 17 हजार 102 लाभार्थींची केवायसी प्रक्रिया रखडली

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण आणि अपात्र लाभार्थ्यांची छाननी या दोन्ही प्रक्रियांमुळे सोयगाव तालुक्यातील रेशन व्यवस्थेची सध्या मोठी फेरतपासणी सुरू आहे. एका बाजूला तालुक्यात ७९ हजार ६६६ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असली, तरी १७ हजार १०२ लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. दुसरीकडे केंद्र शासनाच्या ‘मिशन सुधार’ मोहिमेत १,१३२ शिधापत्रिका एनपीएच प्रवर्गात वर्ग करून त्यावरील…

Read More

फुलंब्री:बोरगाव अर्जच्या विवान बलांडेला तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदक

जम्मू-काश्मीर येथील जम्मू विद्यापीठात २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या मिनी व ८ व्या चाइल्ड राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील खेळाडू विवान भाऊसाहेब बलांडे याने चमकदार व दमदार कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर थेट कांस्यपदक पटकावले आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकारात हे घवघवीत यश मिळवणारा विवान हा…

Read More

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्यावी; काँग्रेसची मागणी:शेतमजुरांना 25 हजार रुपये द्यावेत, महसूलमंत्री बावनकुळे यांना निवेदन‎

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निमेश पटेल यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…

Read More

तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सभा उत्साहात:गंगापूरमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

महिला आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत स्थापित तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र, गंगापूरची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर रोजी दीपाली लॉन्स, गंगापूर येथे पार पडली. प्रास्ताविक सी.एम.आर.सी. व्यवस्थापक सुनिता सहाने यांनी केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते केंद्राच्या १७ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या वार्षिक सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी…

Read More