गोळेगावात रस्त्याचा वाद सामोपचाराने मिटला:रस्ता मोकळा; कौटुंबिक नाते जपण्याचे आवाहन
गंगापूर तालुक्यातील गोळेगाव शिवारातील गट क्रमांक ८१ मधील शेतरस्त्याच्या वादावर अखेर सामोपचाराने तोडगा निघाला. नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांच्या मध्यस्थीने काका-पुतण्यामधील अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटवून ८ फूट रुंदीचा शेतरस्ता मोकळा करण्यात आला. हरून शेख, शब्बीर शेख, मुसा शेख आणि बशीर शेख यांच्या वडिलोपार्जित २८ एकर शेतजमिनीतील रस्त्याच्या प्रश्नावर अनेक वर्षांपासून वाद सुरू होता….