Headlines

साताऱ्यात पावसाचा जोर:महाबळेश्वर आणि पाटणमधील धोकादायक रस्ते वाहतुकीसाठी बंद

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत मुसळधार पाऊस पडत असून डोंगर उतारावरील माती सैल झाल्यामुळे दरड कोसळण्याची, रस्ते खचण्याची तसेच नाले व ओढ्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाबळेश्वर व पाटण तालुक्यातील काही रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरत असून, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने खालील रस्ते वाहतुकीस धोकादायक…

Read More

अर्जुन नागा' नंतर गदर-3 घोषित केली जाऊ शकते:दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले- कथा अणुबॉम्बसारखी असेल

दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ‘गदर 3’ बद्दल एक मोठे अपडेट दिले आहे. त्यांनी पुष्टी केली आहे की, चित्रपटावर काम सुरू आहे, परंतु यावेळी त्यांना कोणतीही घाई नाही. त्यांचे म्हणणे आहे की, तिसऱ्या भागाची कथा पहिल्या दोन्ही भागांपेक्षा अधिक प्रभावी असावी. अनिल यांनी आपली विचारसरणी मनोरंजक पद्धतीने समजावून सांगताना म्हटले की, जर ‘गदर’ एक बॉम्ब होता…

Read More

नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा:हो, मीच दिले नमाजचे ट्रेनिंग; मुख्य आरोपी निदा खानची तपास यंत्रणांसमोर कबुली

नाशिक येथील नामांकित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर, पोलिस कोठडीतील चौकशीदरम्यान तिने अत्यंत धक्कादायक कबुली दिली आहे. “होय, मीच पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचे रीतसर ट्रेनिंग दिले,” अशी कबुली तिने दिली आहे. या…

Read More

छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांवरून संताप:अंबादास दानवेंनी सरकारला धारेवर धरलं; नितीन गडकरींना थेट पत्र

छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेषतः वैजापूरजवळील चार ते पाच किलोमीटरचा पट्टा अत्यंत धोकादायक बनला असल्याचे…

Read More

संभाजीनगरात लघुउद्योजकांचे 30 कोटी रुपयांचे 20 करार:राज्यातील 220 उद्योजक, 27 आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी घेतला सहभाग

छत्रपती संभाजीनगर शहरात लघु उद्योजकांसाठी आयोजित ५ व्या आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीटमध्ये ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे २० व्यावसायिक करार झाले. यामुळे शहरासह राज्यातील अभियांत्रिकी क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली झाली आहेत. केंद्र शासनाच्या रॅम्प योजनेंतर्गत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ आणि ईईपीसी इंडियातर्फे १६ व १७ जून रोजी या…

Read More

अनंत अंबानींचा 31वा वाढदिवस-जामनगरच्या सर्व गावांना भोज:1 लाख गायींना छप्पन भोग; शाहरुख-रणवीरसह अनेक सेलेब्रिटींचा सहभाग, PHOTOS

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र, अनंत अंबानी, आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगाचे औचित्य साधून, गुजरातमधील जामनगर येथे एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे; ज्यामध्ये उद्योगजगतातील अनेक नामवंत व्यक्ती—तसेच बॉलिवूडमधील तारे-तारका—सहभागी होण्यासाठी आधीच दाखल झाले आहेत. गुरुवारी, अनंत यांनी जामनगर येथे ‘गो-सेवा’ (गायींची सेवा) केली. त्यांनी १,००,००० हून…

Read More

वर्धा हादरले:12 वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

वर्धा जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 12 वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका शेतातील घरात या मुलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडल्याने, तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात…

Read More

2029 पूर्वी शिंदेंचे आमदार फुटून भाजपमध्ये जातील:रोहित पवारांचा दावा, शेतकऱ्यांसाठी संभाजीनगरमध्ये आंदोलनाचा इशारा

भाजपचे सध्याचे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरील प्रेम केवळ महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी आहे. २०२९ च्या आधी एकनाथ शिंदेंचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटून भाजपमध्ये जाऊ शकतात,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ‘डिलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) बिल पास करण्यासाठी भाजपला संसदेत अजून ४१ खासदारांची गरज आहे, एकदा…

Read More

वडील बस चालक होते, ₹300 घेऊन अभिनेता बनण्यासाठी निघाला:थिएटरमध्ये ₹50 कमावले, टीव्हीवरून सुरुवात करणाऱ्या यशला केजीएफने पॅन-इंडिया स्टार बनवले

यश आज पॅन-इंडिया सुपरस्टार आहेत, पण त्यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. कर्नाटकातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या यशचे वडील BMTC बस चालक होते, तर आई गृहिणी होती. लहानपणापासूनच त्यांनी ठरवले होते की त्यांना फक्त अभिनेता व्हायचे आहे. घरच्यांच्या चिंतेची आणि पैशांच्या अडचणीची पर्वा न करता ते फक्त ₹300 घेऊन बेंगळुरूला पोहोचले. सुरुवातीला त्यांनी थिएटरमध्ये बॅकस्टेज काम…

Read More

कन्नडच्या रुग्णालयात दररोजची ओपीडी 500 अन् खाटा फक्त 50:उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव 7 वर्षांपासून धूळखात‎

शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचा असलेला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव ७ वर्षांपासून शासनदरबारी धुळखात पडला आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रस्ताव प्रलंबित असून, कन्नडकरांना अद्ययावत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. रुग्णालयात रोजची रुग्णसंख्या ५०० आहे. खाटा केवळ ५० आहेत. त्यामुळे अनेकांना उपचारासाठी मोठ्या शहरात धाव घ्यावी लागत आहे. कन्नड रुग्णालय सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर…

Read More