Headlines

दिलजीत म्हणाला- राजकारणात येण्याचा कोणताही हेतू नाही:पोस्ट शेअर करून अफवांचे खंडन केले, म्हटले- संगीत व चित्रपटांवरच पूर्ण लक्ष केंद्रित राहील

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने राजकारणात येण्याच्या बातम्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू होती की दिलजीत पंजाबच्या राजकारणात प्रवेश करू शकतो. आता त्याने या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. दिलजीतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले, “कदे वी नहीं.” म्हणजेच त्याचा राजकारणात येण्याचा कोणताही…

Read More

रोहित पवारांचं आंदोलन म्हणजे प्रसिद्धीसाठीचं नाटक:गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल, शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करत असल्याचा आरोप

पंढरपुरात सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून केवळ प्रसिद्धीसाठीचे “नाटक” असल्याचा आरोप करत पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. सांगली येथे माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “रोहित पवारांना अभिनय चांगला जमत असल्यामुळे ते…

Read More

मैं जगन्नाथ बसैये बोल रहा हूं’…:रेडिओ चाहत्यांसाठी आवाजाने जपली संगीताची जादू; रेडिओ ते हार्डडिस्क प्रवास

मैं जगन्नाथ बसैये बोल रहा हूं’… “आवाज की दुनिया के दोस्तो…” अशी साद पडली की आजही कान टवकारणारे अनेक रसिक शहरात आहेत. पण गुलमंडीवर राहणाऱ्या जगन्नाथ बसैये यांची संगीताप्रति असलेली आवड आणि निष्ठा निव्वळ थक्क करणारी आहे. १९७६ मध्ये पत्रलेखनापासून सुरू झालेला त्यांचा गाण्यांच्या फर्माइशीचा प्रवास आज थेट आधुनिक हार्डडिस्कपर्यंत येऊन पोहोचला आहे. संगीत ही…

Read More

बिडकीन दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत द्या:आमदार विलास भुमरे यांची मागणी, विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित

पैठण तालुक्यातील बिडकीन येथील पाच तरुणांच्या गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूची दखल विधानसभेत घेण्यात आली. आमदार विलास भुमरे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत मृत तरुणांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. भुमरे यांनी सांगितले की, बिडकीन गावातील १९ तरुण पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे गेले होते….

Read More

भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बीएलएच्या नियुक्तीवरून पदाधिकाऱ्यांना फटकारले:नाशिक येथे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक

मतदार यादी पुनरीक्षणासाठी राज्यात १ लाख ३६ हजार बूथ असून आतापर्यंत भाजपचे ९३ हजार बीएलए नियुक्त आहेत. अद्याप ४३ हजार बीएलएंची नियुक्ती बाकी असून ही चालढकल चालणार नाही, असा सज्जड दम देत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी नाशिकमधील विभागीय बैठकीत पदाधिकाऱ्यांना फटकारले. बूथबाहेर बसून निवडणुका जिंकता येत नाहीत. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे, बूथवर…

Read More

पाटबंधारे विभागाच्या कोन्हेरी कॅनल गळतीमुळे 30 एकर शेती चिखलात:पाच वर्षांपासून गळतीचा प्रकार, लाखो लिटर पाणीजाते वाया‎

एकीकडे सरकार ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ आणि ‘पाणी काटकसरीने वापरा’ असा संदेश देत असताना, मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी परिसरात मात्र पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे उलटाच प्रकार पाहायला मिळत आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या उजव्या कालव्याला गेल्या ५ वर्षांपासून मोठी गळती लागली असून, यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या गळतीमुळे ६ शेतकऱ्यांची तब्बल ३० एकर जमीन…

Read More

विधान परिषद निवडणूक:राज्यात 17 पैकी 5 जागी महायुतीचे पारडे जड; कुठे उमेदवार बाद, तर कुठे माघार, वाचा इलेक्शनची स्टोरी

राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून ‘महायुती’ विरुद्ध ‘महाविकास आघाडी’ (मविआ) असा थेट सामना रंगला आहे. बंडखोरी मोडून काढण्यासाठी पक्षांतर्गत पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच, अर्ज छाननी आणि नाट्यमय घडामोडींमुळे 4 महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीचे पारडे प्रचंड जड झाले असून, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या…

Read More

मागण्या कायद्याच्या चौकटीत मांडा:मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजासाठी जीव ओतून काम करतायत – सुधीर मुनगंटीवार

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील आणि देशातील विविध राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नियुक्तीवरील चर्चेवर भूमिका स्पष्ट केली. “राहुल गांधींना सत्तेत जाण्याची घाई झाली आहे,” असा टोला लगावतानाच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनाही…

Read More

शरद मोहोळ खून प्रकरण:वकील आरोपी संजय उधाणचा जामीन फेटाळला; आरोपींना मदत केल्याचे आढळले पुरावे

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपी असलेल्या वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी संजय उधाण याने गुन्ह्याच्या कटकारस्थानात सहभाग घेतला होता, तसेच गुन्ह्यानंतर आरोपींना मदत केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्याचे न्यायालयाने नमूद केले. संजय उधाण असे या वकिलाचे नाव आहे. विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप सिंग राजपूत यांनी, तसेच मूळ फिर्यादीचे वकील…

Read More

इतिहासातील चुका टाळायला हव्यात:ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे प्रतिपादन, ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि 'हर घर सावरकर' संस्थेतर्फे व्याखानाचे आयोजन

ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी भारतीय समाजाने इतिहासातून बोध घेऊन भूतकाळातील चुका टाळाव्यात, असे प्रतिपादन केले. ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि ‘हर घर सावरकर’ संस्थेतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. तत्कालीन समाज स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या बाजूने ठामपणे उभा न राहणे ही एक मोठी चूक होती, असेही त्यांनी नमूद केले. राम मंदिराच्या उभारणीमध्ये शहीद…

Read More