Headlines

ऍक्शन मोडवर:1925 किलो 3 लाख रु. किमतीचे प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त

शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिके मार्फत गुरुवारी १६ रोजी इतवारा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर विशेष धडक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान सुभाष प्लास्टिक (पप्पू शर्मा) तसेच हारून हाजी प्लास्टिक या आस्थापनांवर अचानक छापे टाकण्यात आले. याशिवाय सुभाष प्लास्टिक यांच्या दोन स्वतंत्र गोदामांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन्ही आस्थापना व…

Read More

भूजल संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक:उपसंचालक शेलार यांचे आवाहन, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपसंचालक प्रकाश शेलार यांनी भूजल संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे आवाहन केले. भूजल ही राज्याची अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून तिचे शास्त्रीय व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वत वापर महत्त्वाचा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या…

Read More

होरनाडू कन्नड संघाचा 10 वा मेळावा: भाषा मन जिंकते:कन्नड भाषेला इतिहास आणि महत्त्व आहे, मेळाव्यात मान्यवरांचे उमटले सूर‎

कन्नड भाषेला इतिहास व महत्त्व आहे. आजही कन्नड संस्कृती दिसून येतो. मराठी राज्यात कन्नड शाळा आहेत. त्यामुळे ही भाषा समृध्द आहे, असे मत किरटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामी यांनी व्यक्त केले. भाषा हे मन जिंकण्याचे साधन आहे. कन्नड बोलल्याने आपलेसे वाटते. त्यामुळे घरात कन्नड बोलले पाहिजे, असे मत माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी व्यक्त केले. कर्नाटक…

Read More

400 हॉस्पिटल बेमुदत बंद, 20 हजार रुग्णांची गैरसोय:आयएमएचा होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी परवानगीला विरोध

सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मकोलॉजी (सीसीएमपी) परीक्षा उत्तीर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) गुरुवारी रस्त्यावर उतरली. या आंदोलनामुळे अमरावतीतील ४०० हून अधिक रुग्णालये बेमुदत बंद ठेवण्यात आली, ज्यामुळे सुमारे २० हजार रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळू शकली नाही. आयएमएच्या सदस्यांनी सकाळी ११.३० वाजता इर्विन चौकातील डॉ….

Read More

गडचिरोलीत हत्तींच्या निरीक्षणासाठी 'फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स'ला वन विभागाची परवानगी:संस्थेला एक वर्षाची मुदत

महाराष्ट्र वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ या संस्थेला हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय निरीक्षण आणि अचूक माहिती संकलित करण्यासाठी एक वर्षाची अधिकृत परवानगी दिली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव संरक्षक यांच्या आदेशानुसार, ही संस्था वन विभागाच्या थेट समन्वयाने काम करेल. संस्थेची मुख्य जबाबदारी हत्तींच्या हालचालींची नोंद ठेवणे,…

Read More

Renowned Marathi Grammar Expert Prof. Yasmin Sheikh Passes Away in Pune

मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (24 ऑगस्ट) पुण्यात निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधना . जन्माने ज्यू, मात्र मराठी भाषेशी आयुष्यभराचे नाते यास्मिन शेख यांचा जन्म 21 जून 1925 रोजी झाला. त्यांचे जन्मनाव जेरुषा रुबेन…

Read More

पुणे वाहतूक कोंडी, प्रदूषणावर उपाय; तीन उन्नत मार्ग:केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारणीची घोषणा

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी तीन उन्नत मार्गांची घोषणा केली आहे. पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत हे तीन प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भूसंपादनाच्या अडचणींमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे मार्ग उभारले जात आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याबद्दल…

Read More

मेटाचा 8,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीचा प्लॅन:20 मे पासून कर्मचारी कपात प्रक्रिया सुरू होईल; जागतिक स्तरावर 10% कर्मचारी कमी होतील

फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा या वर्षी मे महिन्यात सुमारे 8,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना आखत आहे. 2022 च्या अखेरीस आणि 2023 च्या सुरुवातीला झालेल्या पुनर्रचनेनंतर कंपनीचे हे सर्वात मोठे पाऊल असेल. रॉयटर्सच्या अहवालानुसार, मोठ्या प्रमाणावर होणारी ही कर्मचारी कपात 20 मे च्या आसपास सुरू होऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात मेटा आपल्या एकूण जागतिक कर्मचाऱ्यांपैकी…

Read More

‘ऑपरेशन टायगर’चा पहिला फोटो समोर!:पंचतारांकित हॉटेलमधील बैठकीने चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर महत्त्वाची बैठक

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर या संपूर्ण घडामोडींचा कथित पहिला फोटो समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोमुळे पडद्यामागे सुरू असलेल्या राजकीय हालचालींबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या छायाचित्रात ठाकरे गटाची साथ सोडणारे…

Read More

भाजपने म्हटले- महाराष्ट्रात NCPचे दोन्ही गट एकत्र यावेत:त्यानंतर NDA मध्ये सामील व्हा; केंद्रीय मंत्रिमंडळात दोन पदांचीही ऑफर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यांना एकत्र येण्याची ऑफर एनडीएने दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार यावेळी संसदेत महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन विधेयकाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक आणणार आहे. म्हणूनच एनडीएच्या पक्ष नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र येऊन एनडीएचा सहयोगी…

Read More