Headlines

अचलपूर येथील पाटस्करांचा देहदानाचा संकल्प:पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार

अचलपूर शहरातील सरमसपूरा निवासी सुरेशराव ताराचंद पाटस्कर यांनी मरणोत्तर देहदान व अवयवदानाचे संकल्पपत्र भरले आहे. पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हा संकल्प केला असून, यामुळे समाजात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. समाजकार्याची आवड जपणारे सुरेशराव पाटस्कर यांनी ‘मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी देणं लागतं’ या भावनेतून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांसह सुनबाई उपस्थित होत्या. पुण्यात…

Read More

सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ:74,950च्या पातळीवर , निफ्टीही 150 अंकांनी वाढला; बँकिंग आणि फार्मा शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 14 मे रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी अधिक वाढीसह 74,950 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 150 अंकांची वाढ झाली आहे, तो 23,550 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो, मेटल, बँकिंग आणि फार्मा शेअर्समध्ये अधिक खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारात वाढ काल अमेरिकन बाजारात संमिश्र व्यवहार दिसून…

Read More

जाधव गुरुजींची शिक्षण सेवा, समर्पण अन् कार्य प्रेरणादायी:स्वामी जितेंद्रनाथ महाराज, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार‎

लक्ष्मण जाधव गुरुजींनी आयुष्यभर शिक्षण, संस्कार, समाजसेवा आणि अध्यात्म या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपल्या अंगीभूत असलेल्या अनेक कौशल्याचा वापर करत साभिनय पद्धतीने शिक्षण देण्यावर भर दिल्यामुळे ते विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक झाले. नाटक, वक्तृत्व, लेखन, पत्रकारिता अशा विविधांगी पैलूंच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेकांना योग्य दिशा देत सकारात्मक…

Read More

1 सप्टेंबरला मुंबईमध्ये ओबीसींचे राज्यव्यापी आंदोलन: लक्ष्मण हाके:पुण्यातील बैठकीनंतर इशारा, मनोज जरांगेंच्या आंदोलनावरही टीका

ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर १ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला ओबीसी नेते लक्ष्मण हाके, अॅड. मंगेश ससाणे, नवनाथ वाघमारे तसेच राज्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सरकार, ओबीसी मंत्र्यांची भूमिका आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर जोरदार टीका करण्यात आली. भाजपला ओबीसी…

Read More

बिग बॉस फेम बसीर अलीने कॅमेरामॅनला मारले:दावा- पार्टीत दारू पिऊन अभिनेत्रींशी गैरवर्तन करत होता, प्रिन्स नरुला, शिव ठाकरे देखील उपस्थित होते

बिग बॉस 17 फेम बसीर अलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो एका कॅमेरामॅनला वाईट पद्धतीने मारताना दिसत आहे. गोंधळाच्या वेळी बसीर अली खूप आक्रमक दिसला. यावेळी तिथे प्रिन्स नरुला आणि शिव ठाकरे देखील उपस्थित होते. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बसीर अलीने कॅमेरामॅनला थप्पड मारली आणि त्याला ओढले, त्यानंतर त्या व्यक्तीने बसीरच्या…

Read More

पाईप्समध्ये अडकलेल्या रानगव्याची यशस्वी सुटका:वन विभाग आणि स्थानिक यंत्रणांनी थरारक बचाव मोहीम राबवली

सिंहगड रस्ता परिसरातील विश्रांती नगर येथे पाणीपुरवठा वाहिनीच्या दोन मोठ्या पाईप्समध्ये अडकलेल्या एका रानगव्याची वन विभाग आणि इतर यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वी सुटका करण्यात आली. मंगळवारी दुपारी ही आव्हानात्मक बचाव मोहीम पार पडली. मंगळवारी सकाळी ११:५१ वाजता सिंहगड रस्त्यावरील विश्रांती नगर, कॅनॉल रोड येथे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वाहिनीच्या दोन मोठ्या पाईप्समध्ये एक रानगवा अडकल्याचे स्थानिक…

Read More

वैजापूरला ट्रक-रिक्षाच्या धडकेत तरुण जागीच ठार:1 गंभीर जखमी, पुरणगाव चौफुलीवरील घटना‎

नागपूर-मुंबई महामार्गावर पुरणगाव चौफुली येथे भरधाव ट्रक व मालवाहू रिक्षा यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. शुभम दिलीप शेटे (वय २२ रा. शेटे वस्ती, भगगाव) असे घटनेतील मृताचे नाव आहे. खुशाल दत्ता निमसे (वय १७ रा. बेलगांव) हा तरुण जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम व…

Read More

नव्या पंपांमुळे कन्नडचा पाणीपुरवठा सुरळीत:नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अंबाडी धरणावर रात्रभर जागून बसवले विद्युत पंप‎

कन्नड शहराला अंबाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात असून, अत्यल्प जलसाठ्यामुळे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेवक अब्दुल जावेद यांनी कर्मचाऱ्यांसोबत रात्रभर पाण्यात उभे राहून नवे विद्युत पंप बसवून घेतले आहेत. त्यामुळे आता कन्नडचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. कन्नड शहराला अंबाडी प्रकल्पातून ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, या प्रकल्पात सध्या केवळ ११ टक्के जलसाठा शिल्लक…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर संकट आणखी गडद:कशेडी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली; 24 तासांपासून वाहतूक ठप्प, हजारो प्रवासी अडकले

राज्यभर मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून कोकणातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणसह अनेक भागांत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ खवटी परिसरात दगड-मातीचा प्रचंड ढिगारा महामार्गावर कोसळल्याने दोन्ही मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी गेल्या तब्बल…

Read More

कमिटमेंटने नाही, चुकीच्या नात्यांना घाबरा:पद्मकुमार, सिद्धार्थ मेनन, विधात्री बंदी यांनी थेरपी, सन्मान आणि बदलत्या नात्यांवर मांडले मत

‘नातेसंबंध जपण्यापेक्षा त्यांना समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे’ – हीच विचारसरणी ‘मॅक्स, मिन अँड म्याऊझाकी’ या चित्रपटाच्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. हा चित्रपट प्रेम आणि विरहाबरोबरच मानसिक आरोग्य, एकाकीपणा, नात्यांमधील संवाद, वचनबद्धता आणि स्वतःशी जोडले जाणे यांसारख्या विषयांवर भाष्य करतो. दिग्दर्शक पद्मकुमार नरसिम्हामूर्ती, अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अभिनेत्री विधात्री बंदी यांनी दैनिक दिव्य मराठीशी संवाद साधताना…

Read More