प्रशासनासमोर आव्हान:स्वातंत्र्यदिनी होणार 58 आंदोलने, 13 जणांचा आत्मदहनाचा इशारा
शासन आणि प्रशासनाकडून मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) ५८ आंदोलने होत आहेत. या आंदोलनातील १३ जणांनी थेट आत्मदहन करण्याचा टोकाची भूमिका घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपचिटणीस शाखेने १० ऑगस्टअखेर प्राप्त निवेदनांच्या आधारे विभागनिहाय यादी तयार केली आहे. कार्यालयीन नोंदीनुसार १० ऑगस्ट दरम्यान विविध विभागांशी संबंधित ५८ आंदोलनांची नोंद झाली…