Headlines

आता पुन्हा 'पवार विरुद्ध पवार' लढाई नको:एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, रोहित पवारांच्या विधानावर युगेंद्र पवारांचे मत

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. या निमित्ताने गेल्या काही काळापासून दुभंगलेले पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, असे असतानाच २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता आमदार रोहित पवार यांनी वर्तवल्याने राजकीय वर्तुळात…

Read More

दिंडी मार्गाची दुरवस्था; संभाजी ब्रिगेडने केले श्रद्धांजली आंदोलन:56 दिवसातच पडले खड्डे; अपघातांचे प्रमाण वाढल्याचा केला आरोप‎

शेगाव दिंडी मार्गाचे काम जून महिन्यात झाले. मात्र आता या मार्गावर खड्डे पडले असून, संभाजी ब्रिगेडने या रोडवर श्रद्धांजली आंदोलन करत सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधून घेतले. हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत शेगाव पालखी मार्गाचे काम २०१९ मध्ये मंजूर झाले. शेगाव- नागझरी- पारस- निमकर्दा- गायगाव- अकोला- गोरेगाव- माझोड- वाडेगाव- मेडशी- ब्राम्हणवाडा देवा- रिसोड- लोणी आणि बीबी ते किनगाव…

Read More

"एक कुटुंब-एक झाड' संकल्पनेतून अहिल्यानगर हरित करणार- बारस्कर:तपोवन रस्त्यावरील लक्ष्मीनगर परिसरात मोफत फळझाडे व देशी वृक्षांचे वाटप‎

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी दिलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अमूल्य संदेशातून प्रेरणा घेत, शहरात ‘एक कुटुंब – एक झाड’ हा संकल्प साकारण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना मोफत फळझाडे आणि देशी वृक्षांचे वाटप करून ‘हरित अहिल्यानगर घडवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी…

Read More

'अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असावा':शिवप्रतिष्ठानच्या पोस्टरवरून वाद, संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

आज, १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, राज्यात मात्र एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या संस्थेने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका पोस्टरवरून हा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये ‘अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असला पाहिजे’ अशी भूमिका मांडण्यात आली असून, यावरून काँग्रेसने आक्रमक…

Read More

553 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर:लवकरच मतदार यादी, निम्म्या जिल्ह्यात आचारसंहिता

अमरावती जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये लवकरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होईल, त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली जाईल. या ग्रामपंचायती जिल्ह्याच्या निम्म्या भौगोलिक क्षेत्रावर पसरलेल्या असल्याने निवडणुकीच्या काळात तेथे आचारसंहिता लागू होईल. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी…

Read More

जिल्ह्यात खतांचा भीषण तुटवडा:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी अधीक्षकांना घेराव, ‘बफर स्टॉक” खुला करा;‎जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ‎

शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, पेरणीच्या तोंडावर जिल्ह्यात डीएपी व इतर खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवरील डीएपीचा साठा संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही रिकाम . यावेळी शेतकऱ्यांसाठी खतांचा बफर स्टॉक तात्काळ खुला करून देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाभरात डीएपी व इतर खतांचा प्रचंड तुटवडा…

Read More

लहुजी साळवे यांच्या जीवनावर चित्रपट लोकसहभागातून:आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या प्रकल्पासाठी समाजाला आवाहन

क्रांतिवीर वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांच्या जीवनावर आधारित भव्य मराठी चित्रपटाची निर्मिती आता लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक पाठबळाअभावी रखडलेल्या या ऐतिहासिक प्रकल्पासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कथा लेखक व निर्माते सुनील रंगनाथ भोसले यांनी केले आहे. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे…

Read More

गर्लफ्रेंडसोबत ऋषिकेशला फिरायला आलेल्या युवकांची लोकांना मारहाण:अर्धनग्न होऊन थारवर दारू पीत होते; टोकल्यावर लाथा-दगड मारले

ऋषिकेशमध्ये दिल्लीहून गर्लफ्रेंडसोबत वीकेंडला फिरायला आलेल्या तरुणांनी दारूच्या नशेत स्थानिक लोकांशी मारामारी केली. हे सर्वजण काळ्या रंगाच्या थार गाडीवर बसून दारू पीत होते आणि शिवीगाळ करत होते. याच दरम्यान एक तरुण अर्धनग्न होऊन आक्षेपार्ह कृत्ये करत होता. तिथून जाणाऱ्या महिला आणि स्थानिक लोकांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांनी पार्किंग कर्मचाऱ्याकडे याची तक्रार केली. कर्मचाऱ्याने…

Read More

पावसाळी अधिवेशन:परप्रांतीयांच्या बेकायदेशीर बाईक-टॅक्सींना राज्यात ब्रेक, आता 'डोमिसाईल' सक्तीचे; विधानसभेत सरकारची घोषणा

मुंबईसह संपूर्ण राज्याला झोडपणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल अवघ्या तासाभरात स्थगित झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला आज पुन्हा सुरुवात झाली. आजच्या सत्राच्या सुरुवातीलाच राज्यातील अनधिकृत वाहतूक आणि महिला-विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजला. यावर राज्य सरकारने एक अत्यंत कठोर आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या बाईक-टॅक्सी आणि अनधिकृत वाहतुकीला लगाम घालण्यासाठी आता केवळ ‘डोमिसाईल…

Read More