अकोटमध्ये खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा:काळाबाजार, तुटवड्याच्या भितीने नियमित पुरवठा असतानाही रात्रीपासूनच गर्दी
खरीप हंगामासाठी युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या कृषी केंद्रांबाहेर मध्यरात्रीपासूनच रांगा लागत आहेत. सकाळी खतासाठी कुपन घेतल्यानंतर त्यांना खत खरेदी करावे लागत आहे. सातत्याने खताचा पुरवठा होत असतानाही शेतकऱ्यांची गर्दी का होत आहे, यामागील कारणे शेतकरी व कृषी केंद्रांच्या संचालकांनी सांगितली. पाऊस सुरू झाल्यानंतर आणि खताची मागणी वाढल्यानंतर काळाबाजार झाल्यास जादा पैसे मोजावे लागतील, असे काहींचे म्हणणे…