टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगून फोन बंद:किल्ले रायगडावरून उडी मारल्याचा संशय; 37 वर्षीय तरुण बेपत्ता
किल्ले रायगडावरील टकमक टोक परिसरातून ठाण्यातील सुयोग पांचाळ या 37 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलिस, रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने गडावर शोधमोहीम वेगाने सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग काल शनिवारी किल्ले रायगडावर पोहोचला होता. गडावर गेल्यानंतर त्याने घरी फोन करून…